Home Bibles यहेज्केल 7:15 · मराठी बायबल
यहेज्केल 7:15 · मराठी बायबल

शत्रू नगरीबाहेर तलवार घेऊन सज्ज आहे. रोगराई व उपासमार नगरीत आहेत. एखादा बाहेर गेला, तर शत्रू सैनिक त्याला ठार करील आणि ते नगरीत राहिले तर, उपासमार व रोगराई त्यांचा नाश करील.

Cross references

अनुवाद 32:23

“मी इस्राएलांवर संकटे आणील. त्यांच्यावर मी माझ्या बाणांचा नेम धरीन.

अनुवाद 32:25

रस्त्यावर सैन्य त्यांना मारेल व घरात ते भयभीत होतील. तरुण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल.

यिर्मया 14:18

मी जर त्या देशात गेलो, तर मला तलवारीने मारले गेलेले लोक दिसतील. मी जर शहरात गेलो, तर मला सर्वत्र दौर्बल्य आढळेल. कारण लोकांच्याजवळ अन्न नाही. याजकांना आणि संदेष्ट्यांना परदेशात नेले आहे.”‘

यिर्मया 15:2

ते लोक कदाचित् तुला विचारतील, ‘आम्ही कोठे जाऊ?’ तेव्हा तू त्यांना माझा पुढील संदेश दे परमेश्वर म्हणतो,‘काही लोकांना मी मरणासाठी निवडले आहे, ते मरतीलच. काही लोकांची निवड मी लढाईत मरण्यासाठी केली आहे, त्यांना तसेच मरण येईल. काहीना मी उपासमारीने मरण्यासाठी निवडले आहे; ते अन्नावाचून मरतील. काहीची निवड मी देशोधडीला लावण्यासाठीच केली आहे; त्यांना परदेशात कैदी म्हणून पाठविले जाईल.’

विलापगीत 1:20

“परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी दु:खी झाले आहे. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे माझ्या मनात खळबळ उडाली आहे. असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर माझी मुले तलवारीने मारण्यात आली. तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.

विलापगीत 4:9

उपासमारीने मरण्यापेक्षा तलवारीने मेलेले बरे! कारण उपासमार झालेले फारच दु:खी होते. ते व्याकुळ झाले होते. शेतामधून काहीच न मिळाल्यामुळे ते मेले.

यहेज्केल 5:12

तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.

यहेज्केल 6:12

दूरचे लोक रोगराईने मरतील. ह्या जागेच्या आसपासचे लोक लढाईत मरतील. मगच माझा राग शांत होईल.

Interlinear

Choose Theme