नगरातील कामकरी जमिनीची मशागत करतील. हे लोक इस्राएली वंशांपैकी असतील.
Cross references
इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागूतून अन्नधान्य गोळा करुन राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई. शलमोनाचे साम्राज्य
आता इस्राएली लोकांचे नेते यरुशलेम नगरात राहायला आले. बाकीच्या इस्राएलीपैकी कोणी कोणी जायचे ते ठरवायचे होते. म्हणून त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. दर दहाजणापैकी एकाने यरुशलेम या पवित्र नगरात राहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरले.
“गावासाठी तुम्ही 5000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल.