Home Bibles यहेज्केल 48:14 · मराठी बायबल
यहेज्केल 48:14 · मराठी बायबल

लेवी ह्या जमिनीची विक्री वा अदलाबदली करु शकणार नाहीत. त्यांनी देशाचा भाग वेगळा तोडता कामा नये. का? कारण ही जमीन परमेश्वराची आहे. ती विशेष आहे तो जमिनीचा सर्वांत उत्कृष्ट भाग आहे.

Cross references

निर्गम 22:29

“हंगामाच्या वेळी तुमच्या पहिल्या धान्यातून काही व फळफळांचा काही रस मला दान करावा, हंगामाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबू नये.“तू तुझा प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा;

निर्गम 23:19

“हंगामाच्या वेळी जेव्हा तुम्ही धान्य गोळा करता तेव्हा त्या प्रत्येक प्रथम उपजातील उत्तम तुम्ही आधी परमेश्वराच्या मंदिरात आणावे“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवून खाऊ नये.”

लेवीय 23:20

“याजकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी; ती परमेश्वराकरिता पवित्र आहेत; ती याजकाच्या वाट्याची व्हावी.

लेवीय 25:34

लेवी लोकांच्या नगराभोंवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.

लेवीय 27:9

“काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा.

लेवीय 27:28

“लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही.

लेवीय 27:32

“गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल.

यहेज्केल 48:12

ह्या पवित्र जमिनीच्या भागातील हा खास हिस्सा विशेषत: ह्या याजकांसाठीच असेल. हा भाग लेवींच्या भागाच्या पलीकडेच असेल.

मलाखी 3:8

“देवाकडे चोरी करण्याचे सोडून द्या. देवाकडे चोरी करु नये. पण तुम्ही माझ्या वस्तू चोरल्या.”“तुम्ही मला विचारता, ‘आम्ही तुझे काय चोरले?’“तुम्ही मला तुमच्या वस्तूंचा एक दशांश भाग द्यायला हवा. खास भेटी द्यायला हव्यात. पण तुम्ही हे मला देत नाही.

Interlinear

Choose Theme