जमिनीचा 25000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
Cross references
“इस्राएल लोकांना सांग की त्यांनी त्यांच्या भागातील काही शहरे लेवी लोकांना दिली पाहिजेत. इस्राएल लोकांनी काही शहरे आणि त्याच्या आजूबाजूची कुरणे लेवी लोकांना दिली पाहिजेत.
या सर्व द्वारपालांचे नायकत्व चार लेवी द्वारपालांकडे होते. देवाच्या मंदिरातील खोल्या आणि खजिना यांची जपणूक करण्याचे काम त्यांचे होते.
लेवी या धान्याचा स्वीकार करतील तेव्हा अहरोनाच्या वंशातील एखादा याजक त्यांच्याबरोबर असावा. मग लेवींनी ते धान्या देवाच्या, मंदिरात आणावे व मंदिराच्या कोठारांमध्ये जमा करावे.
मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.
ही विशेष जमीन याजकांना आणि लेवी यांच्यात विभागली जाईल.“याजकांना ह्या जमिनीचा एक भाग मिळेल. ही जमीन उत्तरेला 25,000 हात लांबीची, पूर्वेला व पश्र्चिमेला दहा-दहा हजार हात रुंदीची असेल. तिची दक्षिणेला लांबी 25,000 हात असेल. ह्या जमिनीच्या बरोबर मध्यावर परमेश्वराचे मंदिर असेल.
“याजकांना मिळालेल्या जमिनीच्या भागाचा पुढचा भाग लेवींचा हिश्शाचा असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांबीचा व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा असेल. त्यांना पूर्ण लांबी रुंदीची, म्हणजे 25,000 हात (8.3 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची जमीन मिळेल.
“हा जमिनीचा विशेष भाग चौरसाकृती असेल. तो 25,000 हात (8.3 मैल) लांब व 25,000 हात (8.3 मैल) रुंद असेल. खास उद्देशासाठी तुम्ही हा भाग वेगळा ठेवावा. ह्यातील एक हिस्सा याजकसाठी, एक लेवींसाठी व एक नगरासाठी असेल.
तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.