Home Bibles यहेज्केल 45:19 · मराठी बायबल
यहेज्केल 45:19 · मराठी बायबल

याजक पापार्पणातील काही रक्त मंदिराच्या दाराच्या चौकटीच्या खांबावर, वेटीच्या कंगोऱ्याच्या टोंकावर आणि आतल्या अंगणाच्या प्रवेशद्वाराच्या खांबांवर शिंपडतील.

Cross references

लेवीय 16:16

ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.

लेवीय 16:18

मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

यहेज्केल 43:14

जमिनीपासून खालच्या कंगोऱ्यापर्यंत तळ 2 हात (3 फूट 6 इंच) होता. व रुंदी 1 हात (1 फूट 9 इंच) होती. वेदी लहान कंगोऱ्यापासून मोठ्या कंगोऱ्यापर्यंत 4 हात (7 फूट) होती. ती 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती.

यहेज्केल 43:17

कंगोरासुद्धा चौरसाकृतीच होता. तो 14 हात रुंद होती. तळाजवळची पन्हळ 2 हात (3 फूट 6 इंच) रुंद होती. वेदीच्या पायऱ्या पूर्वेकडे होत्या.”

यहेज्केल 43:20

“तू गोऱ्ह्याचे रक्त वेदीच्या चारी शिंगावर, कंगोऱ्याच्या चारी कोपऱ्यावर आणि सर्व बाजूंच्या कडेवर शिंपडशील. अशा रीतीने तू वेदी शुद्ध करशील.

Interlinear

Choose Theme