यहेज्केल 44:18 · मराठी बायबल
ते तागाचे फेटे बांधतील. त्यांची अंतर्वस्त्रेही तागाची असतील. ज्यामुळे घाम येईल अशा प्रकारची कोणतीही वस्त्रे ते घालणार नाहीत.
Cross references
निर्गम 28:40
अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे, कमरबंद व फेटे करावेत; त्यामुळे त्या मुलांचा मान व आदर राखला जाईल.
निर्गम 39:28
आणि त्यांनी तलम सणाचे मंदिल, फेटे व चोळणे केले.
लेवीय 16:4
त्याने पाण्याने स्नान करावे मग तागाचा पवित्र सदरा व तागाचे चोळणे आपल्या अंगात घालावे; तागाच्या कमरपट्ट्याने आपली कमर कसावी आणि तागाचा फेटा बांधावा; ही पवित्र वस्त्रे आहेत.
1 करिंथकरांस 11:4
प्रत्येक मनुष्य जो प्रार्थना करताना किंवा देवाकडून आलेला संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो मस्तकाला लज्जा आणतो.
1 करिंथकरांस 14:40
तर सर्व गोष्टी योग्य रीतीने आणि व्यवस्थित असाव्यात.