माझ्या उंबऱ्याला त्यांचा उंबरा आणि माझ्या दाराच्या खांबाला त्यांच्या दाराचा खांब लावून, ते मला बदनाम करणार नाहीत. पूर्वी, त्यांच्या आणि माझ्यामध्ये फक्त एक भिंत होती. त्यामुळेच त्यांनी प्रत्येक वेळी पाप करताच अथवा भयंकर गोष्ट करताच माझी अप्रतिष्ठा झाली. म्हणूनच मला राग आला व मी त्यांचा नाश केला.
Cross references
आत्ताची वेदी आणि परमेश्वराचे प्रार्थनामंदिर यांच्यामध्ये परमेश्वरासमोर जी पितळी वेदी होती ती आहाजने तिथून हलवली आणि आपल्या वेदीच्या उत्तरेला आणून ठेवली.
परमेश्वराच्या मंदिरात त्याने इतर देवतांच्या पूजेसाठी वेद्याग बांधल्या. (आपल्या नावाप्रीत्यर्थ परमेश्वराने हे मंदिर केले होते.)
पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवलेले होते. नाथान-मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्थ दैवतांच्या सन्मानार्थहोते. योशीयाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला.
परमेश्वराच्या मंदिरात त्याने त्या भलत्यासलत्या देवतांसाठी वेद्या बांधल्या. “माझे नाव यरुशलेममध्ये चिरकाल राहील” असे याच मंदिराबद्दल परमेश्वराने म्हटले होते.
मनश्शेने एका कोरीव मूर्तीची स्थापनाही देवाच्या मंदिरात केली. या मंदिराविषयी दावीद व त्याचा पुत्र शलमोन यांना देव असे म्हणाला होता, “या मंदिरात आणि यरुशलेममध्ये माझे नाव चिरंतन काल राहील. इस्राएलच्या सर्व कुळांमधून मी यरुशलेमला निवडले.
परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “यरुशलेम, मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो की मी तुला शिक्षा करीन. मी तुला शिक्षा करीन असे वचन देतो. का? कारण माझ्या पवित्र स्थानावर तुम्ही भयंकर गोष्टी केल्या. त्यामुळे ते स्थान अपवित्र झाले. मी तुम्हाला शिक्षा करीन. अजिबात दया दाखविणार नाही. मला तुझ्याबद्दल वाईट वाटणार नाही.
तुमचे एक तृतीयांश लोक रोगराईने व उपासमारीने नगरातच मरतील. एक तृतीयांश नगराबाहरे लढाईत मरतील. आणि उरलेल्या एक तृतीयांश लोकांचा माझी तलवार, दूरवरच्या देशांपर्यंत पाठलाग करील. तुमच्या आजूबाजूला राहणारे लोक त्यांना लढाईत ठार करतील. मगच माझा राग शांत होईल.
ह्यानंतरच तुमच्या लोकांवरचा माझा राग मावळेल. माझ्याशी ते अतिशय वाईट वागले, त्यामुळे त्यांना शिक्षा होत आहे, हे मला माहीत आहे. तसेच, ‘मीच परमेश्वर आहे व त्यांच्याबद्दलच्या अतीव प्रेमापोटीमी त्यांच्याशी बोललो हे त्यांना त्या वेळी समजेल.”
मग देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएलचे लोक किती भयानक गोष्टी करीत आहेत, हे तू पाहतोस ना? त्यांनी ही गोष्ट अगदी माझ्या मंदिरालगत उभी केली. आणि जर तू माझ्याबरोबर आलास, तर तुला आणखी भयानक गोष्टी दिसतील.”
त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.
ज्यांची खरोखरच सुंता झालेली नाही, जे पूर्णपणे माझे झाले नाहीत, अशा परक्यांना तुम्ही माझ्या मंदिरात आणले. अशा रीतीने तुम्ही माझे मंदिर अमंगळ केले. तुम्ही आपला करार मोडला, भयंकर कृत्ये केली आणि मला भाकरी, चरबी आणि रक्ताचे अर्पण केले पण ह्यामुळे माझे मंदिर अशुद्ध, अमंगळ झाले.