Home Bibles ☰ Books यहेज्केल 43:21 · मराठी बायबल
यहेज्केल 43:21 · मराठी बायबल

मग पापार्पण करण्यासाठी बैल घे आणि त्याचे मंदिराच्या इमारतीच्या बाहेर, मंदिराच्या आवारात योग्य जागी हवन कर.

Cross references

निर्गम 29:14

नंतर गोऱ्हाचे मांस, कातडे व बाकी राहिलेले शरीर छावणी बाहेर नेऊन आगीत जाळून टाकावे; हा याजकांच्या पाप निवारण्याचा यज्ञ होय.

लेवीय 4:12

असा सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.

लेवीय 8:17

परंतु गोऱ्हा, त्याचे कातडे, त्याचे मांस व त्याचे शेण ही सर्व छावणीबाहेर नेऊन अग्रीत जाळून टाकली, परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने हे केले.

यहेज्केल 45:2

जमिनीचा 500 हाताचा (875फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87फूट 6इंच) रुंदीची मोकळी जागा असेल.

इब्री लोकांस 13:11

यहूदी मुख्य याजक प्राण्यांचे रक्त परमपवित्रस्थानात पापाचे अर्पण म्हणून घेऊन जातात. परंतु केवळ प्राण्यांची शरीरे छावणीच्या बाहेर नेऊन जाळतात.

Interlinear

Choose Theme