Home Bibles यहेज्केल 42:3 · मराठी बायबल
यहेज्केल 42:3 · मराठी बायबल

ह्या इमारतीला, एकमेकांकडे तोंड असलेले सज्जे तीनही मजल्यावर होते. त्यांच्यामध्ये 20 हात (35 फूटाची) मोकळी जागा होती. ही मोकळी जागा इमारत आणि मंदिर यांमध्ये होती. दुसऱ्या बाजूला असलेल्या खोल्यांची तोंडे बाहेरच्या पटांगणाच्या फरसबंदीकडे होती.

Cross references

2 इतिहास 7:3

थेट स्वर्गातून अग्री खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहाते.”

गीतरत्न 1:17

आपल्या घराच्या तुळ्या गंधसरुच्या लाकडाच्या आहेत. छताचे वासे देवदारुच्या लाकडाची आहे.

गीतरत्न 7:5

तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात.

यहेज्केल 40:17

मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.

यहेज्केल 41:10

बाजूच्या खोल्या आणि याजकाच्या खोल्या ह्याच्यामध्ये मोकळी जागा होती. ती मंदिराच्या सर्व बाजूंनी 20 हात (35फूट) एवढी होती.

यहेज्केल 41:15

मंदिराच्या पिछाडीला आरक्षीत जागेत असलेल्या इमारतीचे तोंड पटांगणाकडे होते. ह्या इमारतीची आणि तिच्या दोन्ही बाजूंच्या भिंतीची लांबी त्या माणसाने मोजली. ती 100 हात (175फूट) भरली. सर्वांत पवित्र गाभारा, पवित्र जागा आणि आतल्या पटांगणाकडे उघडणारा द्वारमंडप ह्याच्या भिंतींना

यहेज्केल 42:5

ह्या इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावरील खोल्या, मधल्या व खालच्या मजल्यावरील खोल्यांपेक्षा अरुंद होत्या, कारण सज्जाने बरीच जागा व्यापलेली होती.

Interlinear

Choose Theme