दक्षिणेला, मंदिराच्या अंगणासमोर आणि मंदिराच्या भिंतीच्या बाहेरच्या बाजूला खोल्या होत्या.
Cross references
मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.
मंदिराच्या पश्र्चिमेकडची राखीव केलेल्या जागेतील इमारत 70 हात रुंद आणि 90 हात लांब होती. त्या इमारतीची भिंत सर्व बांजूनी 5 हात (8 फूट 9 इंच) जाड होती. ती 90 हात (175फूट इंच) लांब होती.
नंतर त्या माणसाने मला उत्तरेकडून बाहेरच्या पटांगणात आणले. मग त्याने मला राखीव जागेच्या पश्र्चिमेकडे असलेल्या खूप खोल्यांच्या इमारतीकडे नेले आणि उत्तरेकडच्या इमारतीकडेही नेले.
बाहेरच्या बाजूला, खोल्यांना समांतर अशी भिंत होती. ती बाहेरच्या पटांगणापर्यंत गेली होती. ती खोल्यांच्या समोर होती. तिची लांबी 50 हात (87 फूट 6 इंच) होती.
तो माणूस मला म्हणाला, “पटांगणाच्या समोर असलेल्या उत्तर व दक्षिण दिशेकडील खोल्या ह्या पवित्र आहेत. देवाला बळी अर्पण करणाऱ्या याजकासाठी त्या आहेत. याजक तेथे अती पवित्र पदार्थ खातील. व असा पदार्थ ते तेथेच ठेवतात. का? कारण ती जागा पवित्र आहे. ते पवित्र पदार्थ म्हणजे धान्यार्पण, पापार्पण व दोषार्पण होत.