Home Bibles यहेज्केल 41:1 · मराठी बायबल
यहेज्केल 41:1 · मराठी बायबल

त्या माणसाने मला मंदिराच्या पवित्र स्थानात आणले. त्यांने खोलीच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. ते प्रत्येक बाजूला 6हात (10 फूट 6 इंच) जाड होते.

Cross references

1 राजे 6:1

अशा तऱ्हेने शलमोनाने मंदिर बांधायला सुरुवात केली. इस्राएल लोकांनी मिसर देश सोडल्याला 480 वर्षे झाली होती. इस्राएलाचा राजा म्हणून शलमोनाच्या कारकीर्दीचे हे चौथे वर्षे होते. वर्षाचा दुसरा महिना जिव चालू होता.

1 राजे 6:2

मंदिराची लांबी 90 फूट, रुंदी 30 फूट आणि उंची 45 फूट होती. 3 मंदिराची देवडी 30 फूट आणि उंची 45 फूट होती.

यहेज्केल 40:2

दुष्टान्तात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्या पर्वतावर गावासारखे दिसणारे बांधकाम होते. ते दक्षिणेकडे होते.

यहेज्केल 40:9

तो 8 हात लांब भरला. मग त्याने दाराच्या दोन्ही बाजूच्या भिंती मोजल्या. प्रत्येक भिंत दोन हात (3 फूट 6 इंच) रुद होती. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वाराच्या शेवटी द्वारमंडप होता.

यहेज्केल 40:17

मग त्या माणसाने मला बाहेरच्या पटांगणात आणले. तेथे पटांगणाच्या सर्व बाजूंना खोल्या व फरसबंदी होती. फरसबंदीपुढे तीस खोल्या होत्या.

यहेज्केल 41:3

मग तो माणूस शेवटच्या खोलीत गेला आणि त्याने दाराच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. प्रत्येक बाजूची भिंत 20 हात जाड होती. आणि 7 हात रुंद होती. दार 6 हात रुंद होते.

यहेज्केल 41:21

पवित्र गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंती चौकोनी होत्या.

यहेज्केल 41:23

(पवित्र जागा) आणि सर्वांत पवित्र गाभारा ह्यांना दोन दोन दारे होती.

जखऱ्या 6:12

सर्व शक्तिमान परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो: ‘कोंब’ नावाचा एक माणूस आहे. तो सामर्थ्यवान बनेल. तो परमेश्वराचे मंदिर बांधील.

इफिसकरांस 2:20

तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वत: तिचा कोनशिला आहे.

1 पेत्र 2:5

तुम्हीसुद्धा, जिवंत धोंड्याप्रमाणे आध्यात्मिक मंदिर बांधण्यासाठी रचिले जात आहा. पवित्र याजकगणांप्रमाणे सेवा करण्यासाठी, ज्यांचे काम म्हणजे आध्यात्मिक अर्पणाचा देवासमोर यज्ञ करणे असे आहे. जे देवाला, येशू ख्रिस्ताद्वारे मान्य आहे.

प्रकटीकरण 3:12

जोविजय मिळवितो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. तो पुन्हा कधीही त्याला सोडणार नाही. मी त्याच्यावरमाझ्या देवाचे नाव व माझ्या देवाच्या शहराचे नाव नवे यरुशलेम असे लिहीन. जे माझ्या देवापासून स्वर्गातून खाली येतआहे. आणि मी त्याच्यावर माझे नवे नाव लिहीन.

प्रकटीकरण 11:1

मग मला मोजमाप करण्यासाठी वापरण्यात येण्यासारखी काठी देण्यात आली. आणि मला सांगण्यात आले, “जा आणिदेवाचे मंदिर, वेदी व तेथील उपासकांचे मोजमाप कर.

प्रकटीकरण 21:3

आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली.ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देवहोईल.

प्रकटीकरण 21:15

नगराची, वेशीची आणि भिंतीची लांबी - रुंदी मोजता यावी म्हणून जो देवदूत माझ्याशी बोलला, त्याच्याजवळसोन्याची एक मोजपट्टी होती.

Interlinear

Choose Theme