Home Bibles ☰ Books यहेज्केल 40:19 · मराठी बायबल
यहेज्केल 40:19 · मराठी बायबल

मग त्या माणसाने खालच्या दाराच्या आतील बाजूपासून पटांगणाच्या बाहेरच्या भिंतीपर्यंतचे माप घेतले. ते 100 हात (175फूट) पूर्वेला आणि 100 हात उत्तरेला असे भरले.

Cross references

यहेज्केल 40:23

आतल्या पटांगणाला उत्तरेच्या बाजूकडील दारासमोर एक दार होते. ते पूर्वेच्या दाराप्रमाणे होते. त्या माणसाने एका दरापासून दुसऱ्या दारापर्यंतचे अंतर मोजले. ते 100 हात (175फूट) होते.

यहेज्केल 40:27

आतल्या पटांगणाच्या दक्षिणेला एक दार होते. दक्षिणेकडील दारांमधील अंतर त्या माणसाने मोजले. ते 100 हात (175फूट) होते.

यहेज्केल 46:1

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “आंतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसांत बंद असेल. पण शब्बाथ व अमावस्या ह्या दिवशी ते उघडले जाईल.

Interlinear

Choose Theme