यहेज्केल 4:11 · मराठी बायबल
तुला रोज थोडेच म्हणजे 3 पेलेपाणी पिता येईल. दिवसभर पुरवून तुला ते प्यावे लागेल.
Cross references
यशया 5:13
परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांना पकडून नेले जाईल. का? कारण ते समजदार नाहीत. त्यांच्यातील उच्चपदस्थांची उपासमार होईल. त्यांतील बहुसंख्य तहानेने तळमळतील.
यहेज्केल 4:16
पुढे देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, यरुशलेमच्या धान्य पुरवठ्याचा मी नाश करीत आहे. लोकांना खायला अगदी थोडी भाकरी मिळेल. धान्य पुरवठ्याबाबत त्यांना अत्यंत चिंता पडेल. त्यांना पिण्यालाही अगदी कमी पाणी मिळेल. ते पाणी पिताना घाबरतील.
योहान 3:34
देवाने त्याला (येशूला) पाठविले. आणि देव सांगतो त्याच गोष्टीविषयी तो सांगतो. कारण देव त्याला आत्म्याने पूर्णपणे भरतो.