इतर देशांतून मी माझ्या माणसांना परत आणीन. त्यांच्या शत्रूंच्या देशांतून त्यांना गोळा करीन. मग मी किती पवित्र आहे ते इतर पुष्कळ राष्ट्रांना कळेल.
Cross references
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील.
मगच तुम्ही अर्पण केलेल्या वस्तूंच्या सुंगधाने मी प्रसन्न होईन. मी तुम्हाला परत आणीन तेव्हाच असे घडेल. मी तुम्हाला पुष्कळ देशांत विखरुन टाकले. पण मी तुम्हाला एकत्र करुन माझे खास लोक म्हणून पुन्हा तुमची निवड करीन. सर्व राष्ट्रांसमक्ष मी हे करीन.
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो “मी इस्राएलच्या लोकांना इतर राष्ट्रांत विखुरविले. पण मी पुन्हा त्यांना एकत्र आणीन मग त्या राष्ट्रांना मी पवित्र असल्याचे कळेल व ते माझ्याशी त्याप्रमाणे वागतील. त्या वेळी, माझा सेवक याकोब याला मी दिलेल्या भूमीवर इस्राएल लोक राहतील.
मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
लोकांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो: ‘इस्राएल लोक वेगवेगळ्या राष्टांत गेले आहेत. तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सगळीकडून आणून, एकत्र गोळा करीन आणि त्यांना त्यांच्या देशात परत आणीन.
“तू माझ्या लोकांशी, इस्राएलशी, लढण्यास येशील. तू देशाला व्यापणाऱ्या व प्रचंड गर्जना करणाऱ्या ढगाप्रमाणे येशील. शेवटच्या दिवसांत माझ्या देशाशी लढण्यासाठी मी तुला आणीन. मग, गोग, राष्ट्रांना माझे सामर्थ्य कळून येईल. ते मला मान देतील. त्यांना कळून चुकेल की मी पवित्र आहे. मी तुला काय करील ते ते पाहातील.”
मग मी किती थोर आहे ते दाखवीन. मी पवित्र आहे हे सिद्ध करीन. पुष्कळ राष्ट्रे माझी कृत्ये पाहतील व मग त्यांना ‘मी कोण आहे’ हे कळू येईल. मग त्यांना पटेल की मीच देव आहे.”
सामान्य लोक त्या शत्रू सैनिकांना पुरतील. मी ज्या दिवशी गौरविला जाईन, त्या दिवशी इस्राएलच्या लोकांची कीर्ती होईल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “याकोबच्या लोकांना कैदेतून परत आणीन. इस्राएलच्या सर्व लोकांवर मी दया करीन. माझ्या पवित्र नावाबद्दल आवेशाने भावना प्रकट करीन.