Home Bibles यहेज्केल 36:30 · मराठी बायबल
यहेज्केल 36:30 · मराठी बायबल

मी तुमच्या फळबागाचे आणि शेतांचे उत्पादन वाढवीन मग तुम्हाला कधीही परक्या देशात भुकेने व्याकूळ होऊन लज्जित व्हावे लागणार नाही.

Cross references

लेवीय 25:19

आणि भूमि तुम्हाकरिता चांगले पीक देईल; मग तुम्हाकरिता भरपूर अन्न असेल व तुम्ही देशात सुरक्षित राहाल.

लेवीय 26:4

तुम्ही असे कराल तर मी तुमच्यासाठी योग्य वेळी पाऊस पाडीन; जमीन आपले पीक देईल व मळ्यातील झाडे आपापली फळे देतील.

अनुवाद 29:23

येथील भूमी गंधक आणि खार यांच्यामुळे जळून वैराण होईल. तिच्यात गवताचे पाते देखील उगवणार नाही. सदोम, गमोरा, अदमा व सबोयीम ही शहरे परमेश्वराच्या कोपाने उद्ध्वस्त झाली तसेच या देशाचे होईल.

स्तोत्रसंहिता 85:13

देवाच्या समोर चांगुलपणा जाईल आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील. 14

यिर्मया 31:12

इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील. परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील. परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस, ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल. भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल. इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही.

यहेज्केल 34:27

शेतांत वाढणारी झाडे फळतील. पृथ्वीवर सुगीचा मोसम येईल. त्यामुळे मेंढ्या त्यांच्या बळापासून मी त्यांना वाचवीन. मग त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.

योएल 2:17

याजकांना, परमेश्वराच्या सेवकांना द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये रडू द्या. ह्या सर्व लोकांनी म्हणावे, “परमेश्वरा, तुझ्या माणसांवर दया कर. तुझ्या माणसांची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस. तुझी माणसे दुसऱ्या लोकांनी आम्हाला हसू नये वक्ष “कोठे आहे तुमचा परमेश्वर?” असे विचारू नये.

योएल 2:19

परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही तृप्त व्हाल. ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.

योएल 2:26

मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल. तुम्ही तृप्त व्हाल. तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल. त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.

Interlinear

Choose Theme