“मानवपुत्रा, मिसरचा राजा फारो आणि त्याचे लोक यांना पुढील गोष्टी सांग:“मोठेपणात तुम्ही कोणासारखे आहात?
Cross references
तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन.
“तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून मला माहीत होतास. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”
“यास्तव, यिर्मया, तयार हो, उभा राहा आणि लोकांशी बोल. मी तुला सांगितलेली प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग. लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास, तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मिसरची भूमी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यास देईन. तो मिसरच्या लोकांना घेऊन जाईल. मिसरमधील मौल्यवान वस्तूही तो घेईल. हा नबुखद्नेस्सरच्या सैन्याचा मोबदला असेल.
परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की “मिसरच्या लोकांचा नाश करण्यासाठी मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरचा उपयोग करीन.
“तेव्हा हे मिसर देशा, एदेनमधल्या कोणत्या मोठ्या, बलवान वृक्षाशी मी तुझी तुलना करावी? तू, मृत्युलोकांत, त्या परदेशीयांबरोबर आणि लढाईत मारल्या गेलेल्या लोकांबरोबर, जाऊन पडशील, फारो आणि त्याची माणसे ह्यांच्याबाबतीत तसेच घडेल.” देव, माझा प्रभू, असे म्हणाला.
निनवे तू नील नदीकाठच्या थेब्जपेक्षा (नो-आमोनपेक्षा) चांगली आहेस का? नाही थेब्जच्या सभोवती पाणी होते शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी त्याचा उपयोग होई ती पाण्याचा उपयोग भिंतीप्रमाणेही करी.
तेव्हा माल सांगण्यात आले, “तू पुन्हा पुष्कळ लोकांना, राष्ट्रांना, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्यांना वराजांना संदेश सांगितले पाहिजेत.”