“मानवपुत्रा, माझ्यावतीने बोल. ‘मी पुढील गोष्टी सांगतो’ असे सांग.“ओरडून सांग “तो भयंकर दिवस येत आहे.”
Cross references
परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्कितमान देव हे घडवून आणील.
नगरच्या वेशीजवळील प्रजाजनांनो, रडा. नगरवासीयांनो, आक्रोश करा. पलेशेथ मधील सर्व लोक भयभीत होतील. त्यांचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल. उत्तरेकडे पाहा! धुळीचा लोट उठला आहे. अश्शूरचे सैन्य येत आहे. त्या सैन्यातील सर्व माणसे बलवान आहेत.
राजघराणे व दीबोनमधील लोक गाऱ्हाणे गायला पूजास्थानाला जात आहेत. नबो व मेदबा यांच्यासाठी मवाबचे लोक रडत आहेत. आपले दु:ख प्रकट करण्यासाठी सर्वांनी मुंडन केले आहे व दाढी केली आहे.
त्या गर्वामुळे सर्व देशाला दु:ख भोगावे लागेल. सर्व मवाबवासीयांना रडावे लागेल लोक दु:खी होतील. पूर्वीच्या गोष्टी त्यांना हव्याशा वाटतील. कीर हेरेसेथमध्ये तयार झालेले अंजिराचे केक त्यांना हवे असतील.
सोरविषयी शोक संदेश तार्शीशच्या गलबतावरील प्रवाशांनो, तुमची गलबते जेथे लागतात ते बंदर उध्वस्त झाले आहे तेव्हा शोक करा. (कित्तीहून परतणाऱ्या गलबतांवरील प्रवाशांना ही बातमी सांगितली गेली.)
गलबतांनो, तुम्ही तार्शीशला माघारी जाणे बरे! समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांनी खिन्न व्हायला पाहिजे.
माझ्या सेवकांच्या हृदयांत चांगुलपणा असल्याने ते सुखी होतील. पण तुम्ही दुष्ट प्रवृत्तीचे लोक रडाल, कारण तुमच्या हृदयांत वेदना असतील, तुमचा तेजोभंग होईल, आणि तुम्ही खूप दु:खी व्हाल.
म्हणून शोकवस्त्रे घाला आणि मोठ्याने आक्रोश करा. का? कारण परमेश्वर आमच्यावर रागावला आहे.”
परमेश्वर म्हणतो, “पाहा! उत्तरेला शत्रू-सैनिक एकत्र आले आहेत वेगाने वाहून काठावर पसरणाऱ्या नदीप्रमाणे ते येतील. पूर ज्याप्रमाणे जमीन व्यापतो, तसेच ते सर्व देशांत पसरतील शहरे आणि त्यातील रहिवासी यांना ते गिळतील. त्या देशात राहणारा प्रत्येकजण मदतीसाठी आक्रोश करील.
“मानवपुत्रा, मोठ्याने ओरड व किंचाळ का? कारण तलवार माझ्या लोकांवर व इस्राएलच्या राज्यकर्त्यांवर चालविली जाणार आहे. त्या राजकर्त्यांना युद्ध हवे होते. म्हणून तलवार येईल तेव्हा ते माझ्या लोकांबरोबर असतील. तेव्हा मांडीवर थापट्या मार आणि दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मोठ्याने आक्रोश कर.
मद्यप्यांनो, जागे व्हा व रडा! सर्व दारूड्यांनो, रडा! का? कारण तुमचे गोड मद्य संपले आहे. पन्हा तुम्हाला त्याची चव चाखता येणार नाही.
शेतकऱ्यांनो, दु:खी व्हा! द्राक्षमळेवाल्यांनो, मोठ्याने रडा! का? कारण शेतातील पीक नाहीसे झाले आहे.
गावाच्या खालच्या भागात राहणाऱ्या लोकांनो, तुम्ही रडाल. का? कारण सर्व उद्योगपतींचा आणि श्रीमंत व्यापाऱ्यांचा नाश होईल.
गंधसरु उन्मळून पडले म्हणून देवदार आक्रोश करतील. ते प्रचंड वृक्ष दुसरीकडे नेले जातील. जंगलतोड पाहून बाशानचे अल्लोन वृक्ष आकांत करतील.
श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
तिच्या शारीरिक पीडांच्या भीतीमुळे ते राजे दूरउभे राहतील, आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महान नगरी बाबेल, सामर्थ्याच्या शहरा! एका तासात तुझा न्याय तुझ्यावर येईल!”