परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मी मिसरमधील मूर्तींचा सुध्दा नाश करीन. मी नोफातील पुतळे त्यापासून दूर करीन. ह्यापुढे मिसरमध्ये कोणीही नेता नसेल. मी मिसरमध्ये भीतीचे साम्राज्य निर्माण करीन.
Cross references
“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.
मिसरबद्दल शोक संदेश पाहा, परमेश्वर, जलद गतीने जाणाऱ्या मेघावर आरूढ होऊन येत आहे. देव मिसरमध्ये प्रवेश करील आणि तेथील खोटे देव भीतीने थरथर कापू लागतील. मिसर खरा धैर्यवान होता पण त्याचे धैर्य गरम मेणाप्रमाणे वितळून जाईल.
नोफ (मंमेफिस) आणि तहपन्हेस येथील लोकांनी तुमचा माथा फोडला आहे.
परमेश्वर म्हणतो, “त्या लोकांना पुढील संदेश द्या. ‘त्या खोट्या देवांनी पृथ्वीची आणि स्वर्गाची निर्मिती केली नाही. ते स्वर्ग आणि पृथ्वीवरुन नाहीसे होतील.“
तो मिसरच्या दैवतांच्या देवळांना आग लावील. तो देऊळे जाळील व मूर्ती काढून नेईल. मेंढपाळ ज्याप्रमाणे त्याच्या कपड्यावरील पिसवा व काटे ओढून काढून आपले कपडे स्वच्छ करतो, त्याप्रमाणे नबुखद्नेस्सर मिसर साफ करील. मग तो निर्धास्तपणे मिसर सोडून जाईल.
तो मिसरमधील सूर्य देवतेच्या देवळातील स्मृती शिलांचा नाश करील आणि तेथील दैवतांची देऊळे जाळून टाकील.”
हे मी काय पाहतो? ते सैन्य भयभीत झाले आहे, सैनिक दूर पळून जात आहेत त्यांच्या शूर वीरांचा पराभव झाला आहे. ते घाईने पळून जात आहेत. ते मागे वळून पाहत नाहीत. सगळीकडे धोका आहे.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
“मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
मिसरच्या लोकांनो, गाशा गुंडाळा कैदेस तयार व्हा. का? कारण नोफचा नाश होऊन ते निर्जन होईल. त्या शहरांचा नाश केला जाईल. ती निर्जन होतील.
सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “लवकरच मी नोच्या आमोन देवतेला शिक्षा करीन. मी फारो, मिसर आणि तिचे दैवत यांनाही शिक्षा करीन. मी मिसरच्या राजाला सजा देईन आणि फारोवर अवलंबून असलेल्या लोकांना शिक्षा करीन.
मिसरच्या कैद्यांना मी परत आणीन. मी त्यास त्यांच्या जन्मभूमीत पथ्रोस देशात परत आणीन. पण त्यांचे राज्य महत्वाचे राहणार नाही.
इस्राएल लोक निघून गेले. कारण शत्रूने त्यांच्याकडून सर्वकाही घेतले. पण मिसर त्यांचा स्वीकार करील. मोफ त्यांना मूठमाती देईल. त्यांच्या चांदीच्या खजिन्यांवर रानटी झुडुपे वाढतील. इस्राएल लोकांच्या राहण्याच्या ठिकाणी काटे उगवतील.
ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील.
पूर्वी जसे देवाने आपल्या लोकांना मिसरच्या बाहेर आणले तसेच तो आता आणील. तेव्हा देवाने समुद्राच्या लाटांवर प्रहार करुन समुद्र दुभंगाविला होता आणि लोक तो संकटाचा समुद्र पार करुन आले होते. आता परमेश्वर नद्यांचे पाणी आटवील. तो अश्शूरचे गर्वहरण करील आणि मिसरची सत्ता नष्ट करील.
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन.