Home Bibles यहेज्केल 29:13 · मराठी बायबल
यहेज्केल 29:13 · मराठी बायबल

प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो, “मी मिसरच्या लोकांना पुष्कळ राष्ट्रांत विखरुन टाकीन. पण 40 वर्षानंतर मी त्यांना पुन्हा एकत्र करीन.

Cross references

यशया 19:22

परमेश्वर मिसरमधील लोकांना शिक्षा करील. नंतर परमेश्वर त्यांना क्षमा करील. ते परमेश्वराला शरण जातील. परमेश्वर त्यांच्या प्रार्थनेला पावेल व त्यांना क्षमा करील.

यिर्मया 46:26

मी ह्या सर्व लोकांचा त्यांच्या शत्रूंच्या हातून पराभव करीन. त्या शत्रूंची त्यांना मारण्याची इच्छा आहे. मी त्या लोकांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हवाली करीन.”“फार पूर्वी, मिसरला, शांतता होती. ह्या संकटकाळानंतरही मिसरला शांतता नांदेल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

Interlinear

Choose Theme