म्हणून मी (देव) तुझ्याविरुद्ध आहे. मी नाईल नदीच्या पुष्कळ पाटांच्या विरुद्ध आहे. मी मिसरचा संपूर्ण नाश करीन. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतच नव्हे, तर कुशाच्या सीमेपर्यंतची तुझी सर्व गावे मी ओस पाडीन.
Cross references
“इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व (तांबडा) समुद्र यांच्यामध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी-हहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
यिर्मयाला परमेश्वराचा संदेश मिळाला. मिसरमध्ये राहणाऱ्या सर्व यहूदी लोकांसाठी तो होता. हे लोक मिग्दोल, तहपनहेस, मेमफिस व दक्षिण मिसर येथे राहत होते. संदेश असा होता:
“मिसरमध्ये ह्या संदेशाची घोषणा कर. मिग्दोल, नोफ व तहपन्हेस येथे जाहीर कर ‘युद्धाला तयार व्हा. का? कारण तुमच्या भोवतालचे लोक तलवारीने मारले जात आहेत.’
कोणी मनुष्य वा प्राणी मिसरमधून जाणार नाही.
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “मिसरला मदत करणारे आपटतील, त्यांच्या सत्तेचा तोरा उतरेल. मिग्दोलपासून सवेनेपर्यंतचे मिसरचे लोक युद्धात मारले जातील.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणाला,
मी नाईल नदीला कोरडी करीन आणि ती जागा दुष्टांना विकीन. मी, परमेश्वर, सांगतो की “परक्यांकरवी मी ती भूमी ओसाड करीन.”
परमेश्वरा, तू नद्यांवर रागावला होतास का? झऱ्यांवर तुझा राग होता का? समुद्रावर तू संतापला होतास का? विजयसाठी तुझ्या घोड्यांवर स्वार होताना किंवा रथांवर आरुढ होताना तू रागावला होतास का?