Home Bibles यहेज्केल 24:22 · मराठी बायबल
यहेज्केल 24:22 · मराठी बायबल

पण मी माझ्या पत्नीच्या मृत्यूच्या वेळी जसे वागलो, तसेच तुम्ही वागा. तुमचे दु:ख प्रदर्शित करण्यासाठी मिशा झाकू नका. साधारणपणे सुतकात खातात, ते अन्न खाऊ नका.

Cross references

ईयोब 27:15

त्याची सर्व मुले मरतील आणि त्याच्या विधवेला दु:ख वाटणार नाही.

स्तोत्रसंहिता 78:64

याजक मारले गेले पण विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.

यिर्मया 16:4

“त्या लोकांना भयंकर वाईट प्रकारे मृत्यू येईल. त्यांच्यासाठी कोणीही शोक करणार नाही. त्यांचे कोणीही दफन करणार नाही. त्यांची प्रेते शेणाप्रमाणे जमिनीवर उघडी पडतील. ते लोक शत्रूकडून मारले जातील वा उपासमारीने मरतील. त्यांची प्रेते पक्षी व वन्य प्राणी ह्यांचे भक्ष्य होतील.”

यिर्मया 47:3

“त्यांना घोड्याच्या टापांचे आवाज ऐकू येईल रथांचा गडगडाट व चाकांचा खडखडाट त्यांना ऐकू येईल. वडील आपल्या मुलांचे रक्षण करु शकणार नाहीत. ते इतके दुबळे होतील की ते मदत करु शकणार नाहीत.

यहेज्केल 24:16

“मानवपुत्रा, तू तुझ्या पत्नीवर खूप प्रेम करतोस, पण मी तिला तुझ्यापासून दूर नेत आहे. तुझी पत्नी अचानक मृत्यू पावेल. पण तू अजिबात शोक करु नकोस. तू मोठ्याने रडू नकोस. तू अश्रू गाळू नकोस.

आमोस 6:9

त्या वेळी, कदाचित् काही घरांत दहा लोक जिवंत राहतील आणि ते सुध्दा मरतील.

Interlinear

Choose Theme