Home Bibles यहेज्केल 23:31 · मराठी बायबल
यहेज्केल 23:31 · मराठी बायबल

तू तुझ्या बहिणीमागून गेलीस आणि तिच्याप्रमाणे वागलीस. तू तिचा विषाचा प्याला स्वत:च्या हातात घेतलास, तूच तुझ्या शिक्षेल कारणीभूत आहेस.”

Cross references

2 राजे 17:19

पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.

2 राजे 21:13

शोमरोनचे मापनसूत्र आणि अहाबच्या घराण्याचा ओळंबा मी यरुशलेमवर धरीन. थाळी घासूनपुसून पालथी करुन ठेवावी तशी मी यरुशलेमची गत करीन.

यिर्मया 3:8

इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला.

यिर्मया 7:14

म्हणून, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता व जे मी तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिले ते यरुशलेममधील माझ्या नावाचे घर मी नष्ट करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन. शिलोतील मंदिराप्रमाणे मी ह्या मंदिराचा नाश करीन.

यिर्मया 25:15

परमेश्वराने, इस्राएलच्या देवाने मला या गोष्टी सांगितल्या: “यिर्मया, माझ्या हातातील द्राक्षरसाचा प्याला घे. तो माझ्या क्रोधाचा द्राक्षरस आहे. मी तुला वेगवेगळ्या राष्ट्रात पाठवीत आहे. त्या सर्व राष्ट्रांना हा द्राक्षरस प्यायला लाव.

यहेज्केल 16:47

त्यांनी केलेली भयंकर कृत्ये तू केलीसच पण त्यांच्यापेक्षाही वाईट कृत्ये केलीस.

यहेज्केल 23:13

सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वत:च्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले.

दानीएल 9:12

“देवाने ह्या गोष्टी आमच्या आणि आमच्या नेत्यांच्या बाबतीत घडतील असे सांगितले आणि तशा त्या घडवूनही आणल्या. त्याने आमच्यावर वाईट प्रसंग आणले. यरुशलेमने जे सोसले ते दुसऱ्या कोणत्याही नगराने सोसले नाही

Interlinear

Choose Theme