Home Bibles यहेज्केल 21:16 · मराठी बायबल
यहेज्केल 21:16 · मराठी बायबल

तलवारी, धारदार राहा. उजवीकडे, समोर व डावीकडे वार कर. तुझे पाते नेईल त्या सर्व ठिकाणी जा.

Cross references

उत्पत्ति 13:9

तेव्हा आपण वेगळे व्हावे हे आपल्यासाठी बरे आहे तुला पाहिजे तो प्रदेश तू निवड; तू जर डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, आणि तू जर उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन.”

यहेज्केल 14:17

देव म्हणाला, “किंवा मी कदाचित् त्या देशावर चढाई करण्यासाठी शत्रूसैन्य पाठवीन. ते सैनिक त्या देशाचा नाश करतील. मी तेथील सर्व माणसांना व प्राण्यांना देशाबाहेर हालवीन.

यहेज्केल 16:46

तुझी मोठी बहीण शोमरोन होय. ती तुझ्या उत्तरेला तिच्या मुलींबरोबर (गावांसह) राहत होती. तुझी धाकटी बहीण सदोमही तुझ्या दक्षिणेला तिच्या मुलींसह (गावांसह) राहत होती.

यहेज्केल 21:4

मी सज्जन माणसांना व पापी माणसांना तुझ्यापासून तोडीन. मी माझी तलवार म्योनेतून उपसेन दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत सर्व लोकांविरुद्ध चालवीन.

यहेज्केल 21:20

तलवार कोठल्या रस्त्याचा उपयोग करील हे दाखविण्यासाठी खुणेचा वापर कर. एक रस्ता अम्मोनच्या राब्बा शहराकडे जातो. दुसरा रस्ता यहूदाकडे, यरुशलेम ह्या सुरक्षित केलेल्या (तटबंदीने) नगरीकडे जातो.

यहेज्केल 28:23

मी सीदोनला रोगराई व मृत्यू पाठवीन. शहराबाहेरील तलवार (शत्रूसैनिक) तो मृत्यू आणील. मगच त्यांना कळून चुकेल की मी परमेश्वर आहे.”

Interlinear

Choose Theme