“मानवपुत्रा, इस्राएलच्या लोकांना पुढील कहाणी सांग व त्यांना त्याचा अर्थ विचार.
Cross references
एक दिवस, आपल्यांला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, “तू आमचा राजा हो.”
त्यांना शमशोन म्हणाला, “मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. ही मेजवानी सात दिवस चालणार आहे. मी तुम्हाला एक कोडे घालतो, त्याचे उत्तर त्या कालावधीत शोधून काढा तुम्हाला या कोढ्याचा अर्थ सांगता आला तर मी तुम्हाला तीस सुती अंगरखे आणि तीस पोशाख देईन.
परमेश्वराने नाथानला दावीदाकडे पाठवले. तेव्हा नाथान दावीदाकडे आला. नाथान म्हणाला, “एका नगरात दोन माणसे होती. एक श्रीमंत होता आणि एक गरीब.
मग मी (यहेज्केल) म्हणालो, “बाप रे! परमेश्वरा, माझ्या देवा, मी असे सांगितले, तर मी गोष्ट सांगत आहे. असे लोक म्हणतील हे खरेच घडून येईल. ह्यावर त्यांचा विश्वास बसणार नाही.”
मग सगळ्यांना समजेल की मीच परमेश्वर आहे. मी माझी तलवार म्यानातून उपसली आहे आणि तिचे काम संपल्याशिवाय ती परत म्यानात जाणार नाही. हेही त्यांना कळेल.”
आणि ही गोष्ट आज्ञा पाळण्यास नकार देणाऱ्यांना (इस्राएलला) सांग त्यांना पुढील गोष्टी सांग ‘परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो.“‘भांडे चुलीवर ठेव. ते चुलीवर ठेवल्यावर त्यात पाणी ओता.
मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले.
पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.
म्हणून मी त्यांना गोष्टीरूपाने बोध करतो, कारण ते पाहत असताना ही त्यांना दिसत नाही आणि ऐकत असतांनाही त्यांना समजत नाही.
ते यासाठी की, संदेष्ट्यांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की,“गोष्टी सांगायला मी आपले तोंड उघडीन, जगाच्या स्थापनेपासून गुप्त राहिलेल्या गोष्टी मी बोलेन.” स्रोत्र 78:2
अशा अनेक बोधकथांनी त्याने ते समजू शकतील असा संदेश त्यांना सांगितला.
आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशत:कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन,