Home Bibles यहेज्केल 17:11 · मराठी बायबल
यहेज्केल 17:11 · मराठी बायबल

परमेश्वराचा आवाज मला ऐकू आला. तो म्हणाला,

Cross references

2 इतिहास 36:13

सिद्कीयाने नबुखद्नेस्सर विरुध्द उठाव केला. नबुखद्नेस्सरने पूर्वी सिद्कीया कडून स्वत:शी एकनिष्ठतेची शपथ वाहवली होती. सिद्कीयाने तेव्हा देवाची शपथ घेऊन तसे वचन दिले होते. पण तरीही सिद्कीयाने आडमुठेपणा केला आणि आपला आयुष्यक्रम बदलून इस्राएलच्या परमेश्वर देवाचे आज्ञापालन करायचे नाकारले.

स्तोत्रसंहिता 88:9

अति द:ुखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.

यिर्मया 24:8

“पण यहूदाचा राजा सिद्कीया हा त्या अतिशय नासल्यामुळे खाण्यालायक न राहिलेल्या अंजिरासारखा असेल. सिद्कीया त्याचे उच्चपदस्थ अधिकारी, यरुशलेममध्ये उरलेले लोक व मिसरमध्ये राहत असलेले यहूदी हे सर्व त्या नासक्या अंजिरासारखे असतील.

यिर्मया 27:12

“‘यहूदाचा राजा सिद्कीया ह्याला मी असाच संदेश दिला. मी म्हणालो, “सिद्कीया, तुला तुझी मान बाबेलच्या राजाच्या जोखडात अडकवलीच पाहिजे आणि त्याचा हुकूम मानला पाहिजे. तू, बाबेलचा राजा आणि त्याची प्रजा, ह्यांची सेवा केलीस, तरच तू जगशील.

Interlinear

Choose Theme