मी तुझे सांत्वन करीन. मग तू स्वत: केलेली दुष्कृत्ये आठवून लज्जित होशील.
Cross references
“चोराला लोकांनी पकडताच तो शरमिंदा होतो. त्याचप्रमाणे इस्राएलचे लोक झाले आहेत. राजे आणि नेते, याजक आणि संदेष्टे लज्जित झाले आहेत.
म्हणून परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो, “मी तुमच्यावर भयंकर संकट आणीन. का? कारण तुम्ही माझे नियम पाळले नाहीत, माझ्या आज्ञा मानल्या नाहीत. तुमच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांपेक्षा तुम्हीच माझे नियम अधिक मोडलेत. एवढेच नाही तर ते लोक ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे म्हणत होते, त्याच तुम्ही केल्यात.”
काही लोक त्या देशातून निसटतील, ते आपल्या मुलांमुलीना घेऊन, मदतीसाठी तुझ्याकडे येतील. मग ते लोक खरोखर किती वाईट आहेत, हे तुला कळेल आणि यरुशलेमवर मी आणलेली सर्व संकटे पाहून तुला बरेच वाटेल.
“तेव्हा आता तुला अपमान सहन केलाच पाहिजे. तुझ्या बहिणींना तुझ्या तुलनेत, तूच चांगले ठरविले आहेस. तू भयंकर गोष्टी केल्या आहेस, तेव्हा तुला लज्जित व्हावेच लागेल.”
मी तुझ्याशी चांगले वागीन. मग तू माझे स्मरण ठेवशील आणि तू केलेल्या वाईट कृत्यांची तुला लाज वाटेल. तू जे काय केलेस, त्याबद्दल मी तुला क्षमा करीन. मग तुला पुन्हा लज्जित व्हावे लागणार नाही.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
तुम्ही केलेल्या वाईट गोष्टी तुम्हाला आठवतील. त्या गोष्टी चांगल्या नव्हत्या, हे तुम्हाला स्मरेल. मग तुम्ही केलेल्या पापाबद्दल आणि भयानक कृत्यांबद्दल स्वत:चाच तिरस्कार कराल.”