म्हणून परमेश्वर, प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो, तुम्ही बांगड्यासारखे कापडी पट्टे करुन लोकांना सापळ्यात पकडू बघता पण मी त्यांना मुक्त करीन. तुमच्या हातातील ते कापडी पट्टे मी फाडून टाकीन, म्हणजे ते लोक पिंजऱ्यातून सोडून दिलेल्या पाखराप्रमाणे स्वतंत्र होतील.
Cross references
पण आता परमेश्वर, माझ्या प्रभु, खरोखरच बोलेल. तो म्हणतो, “तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खोटे दुष्टान्त पाहिले. म्हणून मी (देव) तुमच्याविरुद्ध आहे.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, असे म्हटले.
मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’
“परमेश्वर, माझा प्रभू, ह्या गोष्टी सांगतो. स्त्रियांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही कापडाच्या पटृ्या करुन लोकांना बांगड्यांप्रमाणे घालायला देता, डोक्याला बांधण्यासाठीही विशेष प्रकारचे पट्टे करुन देता. तुम्ही लोकांना सांगता की ह्या गोष्टीमध्ये तुमच्या आयुष्याचे नियंत्रण करण्याची जादूची शक्ती आहे. स्वत:ला जगविण्यासाठी तुम्ही लोकांना अशा रीतीने जाळ्यात पकडता!
यान्रेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व सत्य अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी ही माणसे आहेत.