मग परमेश्वराचा आत्मा माझ्यात उतरला. तो मला म्हणाला, “ह्या गोष्टी मी सांगितल्या आहेत असे त्यांना सांग. इस्राएलच्या कुटुंबियांनो, तुम्ही फार मोठे बेत करीत आहात. पण तुमच्या मनांत काय आहे ते मी जाणतो.
Cross references
मग परमेश्वर ढगातून खाली आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर (नेत्यावर) ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतू त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगीतला नाही.
तुझ्यात त्यावेळी परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तू राहणार नाहीस. अगदी वेगळाच होशील. त्यांच्याबरोबर तूही भविष्यकथन करु लागशील.
शौल आपल्या नोकरासह गिबाथ एलोहिम या टेकडीवर आला. तिथे त्याला इतर संदेष्टे भेटले. परमेश्वराच्या आत्म्याचा जोरदार संचार होऊन तो ही इतर संदेष्ट्यां प्रमाणे भविष्य करु लागला.
“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.
वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर. देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्दयात डोकावून बघू शकतोस.
तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प बसावे असे तुम्हाला वाटते तुम्ही काही बोलत नाही. आणि मी ही गप्प राहावे असे तुम्हाला वाटते. पण मी मुळीच गप्प बसणार नाही. मी हे तुम्हाला स्वच्छ सांगेन आणि तुमच्या तोंडावर टीका करीन.
मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहीत आहे तुला माझे विचार खूप दुरुनही कळतात.
तुम्ही लोक म्हणता, “आम्ही मृत्यूबरोबर करारनामा केला आहे. अधोलोकाशी आम्ही करार केला आहे म्हणून आम्हांला शिक्षा होणार नाही. शिक्षा आमचे काही वाकडे करू शकणार नाही. कारण आम्ही कपट व असत्य याच्यांमागे लपून बसू.”
तुम्हाला शक्य असेल तेवढ्या जोरात ओरडा. थांबू नका. रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे मोठ्याने ओरडा. लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांगा. याकोबाच्या वंशजांपुढे त्यांच्या पापांचा पाढा वाचा.
त्यांची प्रत्येक कृती मला दिसते. यहूदाचे लोक त्यांची कृत्ये माझ्यापासून लपवू शकत नाहीत. त्यांचे पाप माझ्यापासून लपून राहात नाही.
पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
मग वाऱ्याचा झोत आला व त्याने मला उभे केले. माझ्याशी बोलणाऱ्याचे (देवाचे) बोलणे मी ऐकले.
मी तुला त्या लोकांशी बोलण्यासाठी पाठवीत आहे. ते फार हटृ आहेत, निष्ठुर आहेत. पण तुला त्यांच्याशी बोललेच पाहिजे. तू पुढील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेस. ‘ह्या गोष्टी परमेश्वराने, आपल्या प्रभूने सांगितल्या आहेत असे तू त्यांना बोलले पाहिजेस.’
मी तुला सांगितलेल्या गोष्टी तू त्यांना सांगितल्या पाहिजेस. ते तुझे ऐकणार नाहीत, हे मला माहीत आहे. ते पापापासून परावृत्त होणार नाहीत का? कारण ते बंडखोर आहेत.
मग परागंदा झालेल्या तुझ्या सर्व लोकांना जाऊन सांग, ‘परमेश्वराने, आपल्या प्रभूने पुढील गोष्टी सांगितल्या:’ ते तुझे ऐकणार नाहीत. पाप करायचे थांबवणार नाहीत, तरी तू ह्या गोष्टी सांगच.”
पण वारा आला आणि त्याने मला वर उचलले. तो मला म्हणाला, “घरी जा, आणि स्वत:ला घरात कोंडून घे.
मी तुझ्याशी बोलेन आणि नंतर तुला बोलण्याची परवानगी देईन. पण तू त्यांना ‘परमेश्वर, आपला प्रभू पुढील गोष्टी सांगतो’ असे सांगितलेच पाहिजे. एखाद्याने ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा, न ऐकण्याचे ठरविले तरी वाहवा! ते लोक नेहमीच माझ्याविरुद्व वागतात.
एके दिवशी मी (यहेज्केल) माझ्या घरात बसलो होतो व यहुदातील वडीलधारी लोक (नेते) माझ्यासमोर बसले होते. परागंदा काळातील सहाव्या वर्षाच्या सहाव्या महिन्याच्या (सप्टेंबरच्या) पाचव्या दिवसाची ही गोष्ट आहे. एकदम माझ्यावर परमेश्वराचे, सामर्थ्य आले.
“मानवपुत्रा, ‘परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो,’ असे सोरच्या राजाला सांग:“तू फार गर्विष्ठ आहेस. तू म्हणतोस “मी देव आहे. समुद्राच्या मध्यभागी मी देवाच्या आसनावर बसतो.”“पण तू मानव आहेस, देव नाही. तुला आपण देव आहोत असे फक्त वाटते.
त्याला सांग ‘प्रभू, माझा परमेश्वर, म्हणतो:“मिसरचा राजा, फारो, मी तुझ्याविरुद्ध आहे. तू नाईल नदीकिनारी पडून राहणारा प्रचंड समुद्रातला राक्षस आहेस. तू म्हणतोस, “ही माझी नदी आहे! मी ही नदी निर्मिली”
परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, “त्या वेळी तुझ्या मनात एक कल्पना येईल, तू एक दुष्ट बेत आखू लागशील.
परमेश्वर म्हणतो, “तुम्ही माझी निंदा केलीत.”पण तुम्हीच विचारता “आम्ही तुझ्याबद्दल काय बोललो?”
आणि येशूला त्याच क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की, ते स्वत:शी असा विचार करीत आहेत. तो त्यांस म्हणाला, “तुम्ही या गोष्टीविषयी आपसाात का कुजबूज करत?
यरूशलेमेहून आलेले नियमशास्त्राचे शिक्षक म्हणत होते की, “याच्यामध्ये बालजबूल आहे.” आणि त्या भुतांच्या अधिपतीच्या सामर्थ्याने हा भुतांना घालवून देतो.”
परंतु येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही. कारण येशूला त्यांचे विचार माहीत होते.
तिसऱ्या वेळी तो त्याला म्हणाला, “शिमोना, योहानाच्या मुला, तू माझ्यावर प्रीति करतोस का?”पेत्र दु:खी झाला कारण येशूने त्याला तिसऱ्यांदा विचारले होते, ‘तू माझ्यावर प्रीति करतोस का?’तो म्हणाला, “प्रभु, तुम्हांला सर्व गोष्टी माहीत आहेत, तुम्हांला माहीत आहे की, मी तुमच्यावर प्रीति करतो.”येशू म्हणाला, “माझ्या मेंढरांना चार.
पेत्र हे बोलत असतानाच त्याचे बोलणे ऐकत बसलेल्या सर्व लोकांवर पवित्र आत्मा आला.
त्यानंतर मी माझ्या भाषणाला सुरुवात केली. सुरुवातीला ज्याप्रमाणे पवित्र आत्मा आपल्यावर आला तसाच तो त्यांच्यावरही आला.
आणि कोणतीही अशी निर्मित गोष्ट नाही की जी त्याच्यापासून लपलेली आहे आणि ज्याच्यापाशी आम्हांला सर्व गोष्टींचा हिशेब द्यावयाचा आहे. त्याच्यासमोर सर्व गोष्टी उघड व स्वष्ट अशा आहेत.
होय, जीभ ही ज्वाला आहे. आपल्या शरीराच्या सर्व अवयवामध्ये वाईट गोष्टींची ती खाणच आहे. जीभ ही आपल्या सर्व शरीराला विटाळविणारी आहे. ती आपल्याला अपवित्र करते. आपल्या सर्व अस्तित्वालाच ती आग लावते. ती तरकाच्या ज्वालांनी जीवन पेटवते.
तर मी तिच्या अनुयायांना ठार मारुन टाकीन.मग सर्व मंडळ्यांना हे कळेल की मी तो आहे जो अंत:करणे आणि मने पारखतो. तुमच्या कृतींप्रमाणे मी प्रत्येकाला तुमचामोबदला देईन.