Home Bibles निर्गम 8:6 · मराठी बायबल
निर्गम 8:6 · मराठी बायबल

मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला.

Cross references

निर्गम 9:14

तू हे केले नाहीस तर मग मी माझे सारे सामर्थ्य तुझ्याविरुद्ध तुझे सेवक व तुझ्या लोकांच्याविरुद्ध वापरीन. तेव्हा मग तुला माहीत होईल की या जगात माझ्यासारखा दुसरा देव नाही.

निर्गम 9:29

मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे.

निर्गम 10:2

तसेच तुम्ही तुमच्या मुलांना व नातवंडांना मी मिसरमध्ये केलेल्या चमत्कारांचे व अद्भुत गोष्टींचे वर्णन सांगावे. मग तुम्हा सर्वांना कळेल की मी परमेश्वर आहे.”

निर्गम 15:11

“परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!

लेवीय 11:12

जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टिने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.”

अनुवाद 4:35

परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही.

अनुवाद 32:31

आपल्या शत्रूंचा दुर्ग म्हणजे परमेश्वर आपल्या अभेद्य किल्यासारख्या परमेश्वराच्या तोडीचा नाही हे तेही कबूल करतात.

अनुवाद 33:26

“हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो.

2 शमुवेल 7:22

माझ्या प्रभो परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. तुझ्यासारखा कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. तुझ्या लीला आम्ही ऐकल्या आहेत म्हणून आम्ही हे जाणतो.

2 इतिहास 6:14

शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.

स्तोत्रसंहिता 78:45

देवाने चावणाऱ्या माशांचे थवे पाठवले. ते मिसरमधल्या लोकांना चावले, देवाने बेडूक पाठवले. त्यांनी मिसरमधल्या लोकांच्या आयुष्याचा नाश केला.

स्तोत्रसंहिता 86:8

देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.

स्तोत्रसंहिता 90:2

देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.

स्तोत्रसंहिता 105:30

त्यांचा देश बेडकांनी भरुन गेला. राजाच्या शयनकक्षात देखील बेडूक होते.

यशया 43:10

परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल.

प्रकटीकरण 16:13

तेव्हा मी तीन अशुद्ध आत्मे जे बेडकासारखे दिसत होते ते पाहिले. ते प्रचंड सापाच्या मुखातून बाहेरआले. श्र्वापदाच्या मुखातून बाहेर आले, खोट्या संदेष्ट्याच्या मुखातून बाहेर आले.

Interlinear

Choose Theme