Home Bibles निर्गम 8:16 · मराठी बायबल
निर्गम 8:16 · मराठी बायबल

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.”

Cross references

निर्गम 4:23

परमेश्वर म्हणतो, ‘इस्राएल माझा मोठा मुलगाआहे. आणि मी तुला सांगत आहे की तू माझ्या थोरल्या मुलाला माझी उपासना करण्याकरिता जाऊ दे! जर तू माझ्या प्रथम जन्मलेल्या मुलास म्हणजे माझ्या इस्राएल लोकांस जाऊ देण्याचे नाकारशील तर मी तुझ्या प्रथम जन्मलेल्या म्हणजे थोरल्या मुलास ठार मारीन.”‘

निर्गम 5:1

मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देवम्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.”‘

निर्गम 8:5

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.”

निर्गम 8:17

त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगव्व्या मिसर देशात धुळीच्या उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या.

स्तोत्रसंहिता 105:31

देवाने आज्ञा केली आणि माशा व चिलटे आली. ती सगळीकडे होती.

Interlinear

Choose Theme