निर्गम 6:11 · मराठी बायबल
“जा व फारोला सांग की त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिलेच पाहिजे.”
Cross references
निर्गम 3:10
तेव्हा मी आता तुला फारोकडे पाठवीत आहे! तर तू आता त्याच्याकडे जा! आणि माझ्या लोकांना म्हणजे माझ्या इस्राएल लोकांना मिसरमधून तुझ्या पुढाकाराने घेऊन ये!”
निर्गम 5:1
मोशे व अहरोन इस्राएल लोकांशी बोलल्यानांतर फारोकडे गेले व त्याला म्हणाले, “इस्राएल लोकांचा देवम्हणतो, ‘माझ्या लोकांना माझ्या सन्मानाकरिता उत्सव करावयास रानात जाऊ द्यावे.”‘
निर्गम 5:23
मी फारोकडे जाऊन तू मला सांगितलेल्या गोष्टी त्याला सांगितल्या. परंतु त्या वेळेपासून तो लोकांशी अधिक कठोरपणे वागत आहे. आणि त्यांच्या मदतीकरिता तू काहीच केले नाहीस!”
निर्गम 6:29
तो त्याला म्हणाला, “मी परमेश्वर आहे. मी तुला सांगतो ते सर्व तू मिसरचा राजा फारो याला सांग.”
निर्गम 7:1
परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुझ्याबरोबर असेन मी तुला फारोसाठी देव असे केले आहे; आणि अहरोन हा तुझा संदेष्टा होईल;