निर्गम 40:23 · मराठी बायबल
मग त्याने त्याच्यावर परमेश्वरासमोर समर्पित भाकर ठेवली; परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे त्याने हे केले.
Cross references
निर्गम 25:30
माझ्यापुढे मेजावर समक्षतेची भाकर ठेवावी व ती नेहमी माझ्यापुढे असावी.
निर्गम 40:4
मग तेज आणून आत ठेव व त्याच्यावरील सामान व्यवस्थित ठेव; नंतर दीपवृक्ष मंडपात आण व त्यावरील दिवे योग्य ठिकाणी ठेव.
मत्तय 12:4
देवाच्या मंदिरात तो गेला आणि त्याने व त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी समर्पित केलेल्या भाकरी खाल्ल्या. असे करणे नियमशास्त्रच्या विरूद्ध होते. फक्त याजकांनाच ती भाकर खाण्याची परवागी होती.
इब्री लोकांस 9:2
कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात.