परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी मोशेने अहरोनाला सांगितल्या व देवाने त्याला का पाठवले तेही सांगितले; तसेच परमेश्वराने मोशेला जे चमत्कार करून दाखवावयाची आज्ञा दिली होती त्याविषयीही त्याने अहरोनाला सांगितले.
Cross references
तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊनकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस.
मग देव बोलला, “तू तुझ्या काठीचा चमत्कार दाखवल्यावरही जर त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर मग हा हाताचा चमत्कार दाखवल्यावर ते तुझ्यावर विश्वास ठेवतील.
तो तुझ्याबरोबर फारोकडे येईल. तू काय बोलावेस ते मी तुला सांगेन: मग ते तू अहरोनाला सांग, आणि मग अहरोन योग्य शब्दात फारोशी बोलेल.
तेव्हा मोशे पर्वतावरून खाली आला, व त्याने इस्राएल मधील वडिलधाऱ्या माणसांना म्हणजे पुढाऱ्यांना एकत्र बोलावले; परमेश्वराने त्याला आज्ञा केल्याप्रमाणे सर्व गोष्टी त्याने त्यांना सांगितल्या;
मोशे इस्राएलच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. त्याने त्यांना परमेश्वराकडून आलेल्या आज्ञांबद्दल सांगितले:
“त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”
मुलाने उत्तर दिले, मी जाणार नाही, परंतु नंतर त्या मुलाने जायचे ठरविले व तो गेला.