Home Bibles निर्गम 4:24 · मराठी बायबल
निर्गम 4:24 · मराठी बायबल

मोशे मिसरच्या प्रवासात असताना एके ठिकाणी मुक्कामासाठी थांबला. तेव्हा परमेश्वराने मोशेला त्या ठिकाणी गाठून त्याला ठार मारण्याचाप्रयत्न केला.

Cross references

उत्पत्ति 17:14

ज्या कोणाची सुंता झाली नाही त्याला समाजातून बाहेर टाकावे; कारण त्याने माझा करार मोडला आहे.”

उत्पत्ति 42:27

ते भाऊ रात्रीच्या मुक्कामासाठी एका ठिकाणी थांबले. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने त्याच्या गाढवाला थोडेसे धान्य देण्यासाठी आपली गोणी उघडली तेव्हा त्याने धान्यासाठी दिलेल पैसे त्याला त्या गोणीत आढळले.

निर्गम 3:18

ते वडीलधारे (पुढारी) तुझे एकतील मग तू व ते वडीलधारे (पुढारी) मिळून तुम्ही मिसरच्या राजाकडे जा व त्याला सांगा, ‘इब्री लोकांचा देव ‘याव्हे’ आम्हाकडे आला. व त्याने आम्हास वाळवंटात तीन दिवसांचा प्रवास करून जाण्यास व तेथे आमचा देव ‘याव्हे’ यासाठी बळी अर्पण करण्यास सांगितले आहे.’

लेवीय 10:3

मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.

गणना 22:22

बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणारहोता.

1 राजे 13:24

परतीच्या वाटेवर एका सिहाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला मारुन टाकले. देवाच्या माणसाचा मृतदेह रस्त्यातच पडला होता. गाढव आणि सिंह त्याच्या प्रेताशेजारीच होते.

1 इतिहास 21:16

दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखववड्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते.

होशेय 13:8

जिची पिल्ले तिच्यापासून हिरावून घेतली गेली आहेत अशी अस्वलाची मादी जसा हल्ला करील, तसाच मीही त्याच्यावर तुटून पडेन. मी त्यांच्यावर चढाई करीन. मी त्यांच्या छाती फाडीन. सिंह किंवा इतर हिस्र पशू आपली शिकार जशा फाडून खातात तसेच मी करीन.”

Interlinear

Choose Theme