त्यांनी कमरपट्टा विणला व तो एफोदाला अडकवला. हा पट्टाही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याच्या जरीचा, निव्व्या, जांभव्व्या, किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा त्यांनी तयार केला.
Cross references
“एफोद बांधण्यासाठी कारागिरांनी फार काळजीपूर्वक एक पट्टी विणावी; ही एफोदाप्रमाणेच म्हणजे सोन्याची जर, व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाचे सूत व कातलेल्या तलम सणाच्या कापडाने विणावी.
याजकाच्या विशेष प्रकारच्या वस्त्रातून अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाबरोवरचा झगा घालावा; त्याला एफोद व न्यायाचा ऊरपट बांधावा आणि बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांधावा;
मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्याला झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि अहरोनावर नक्षीदार सुंदर पट्टी आवळून बांधली.
आणि जे काही मी तुम्हांला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा. आणि पाहा, काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन.ʈ
कारण प्रभूपासून जे मला मिळाले तेच मी तुम्हांला दिले. प्रभु येशूला ज्या रात्री मारण्यासाठी धरुन देण्यात आले. त्याने भाकर घेतली.
मी कोणाला तरी दीपस्तंभामध्ये पाहिले जो “मनुष्याच्या पुत्रासारखा” होता. त्याने लांब पायघोळझगा घातला होता. त्याने सोन्याचा पट्टा छातीवर बांधला होता.