निर्गम 39:21 · मराठी बायबल
त्यांनी नंतर न्यायाच्या ऊरपटाच्या गोल कड्या एफोदाच्या गोल कड्यांनी निव्व्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो एफोदावर घट्ट बसावा; परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले.
Cross references
मत्तय 16:24
तेव्हा येशूने आपल्या शिष्यांस म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वत:ला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
1 करिंथकरांस 1:25
तथापि ज्यांस तुम्ही देवाचा ‘मूर्खपणा’ म्हणता ते मानवप्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे. आणि ज्यांस तुम्ही देवाचा ‘दुर्बळपणा’ समजता ते मानवप्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तितशाली आहे.
1 करिंथकरांस 1:27
त्याऐवजी जगातले जे मूर्ख पण त्यांना त्याने निवडले, यासाठी की, शहाण्या माणसास फजित करावे.