निर्गम 35:26 · मराठी बायबल
ज्या इतर स्त्रियांना मदत करण्याची इच्छा झाली त्या सर्वानी आपले कौशल्य दाखवून बकऱ्याच्या केसाचे कापड आणले.
Cross references
निर्गम 35:21
नंतर ज्या लोकांना मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी दर्शनमंडपाच्या कामासाठी, त्यातील सगळया सेवेसाठी आणि पवित्र वस्त्रासाठी परमेश्वराला अर्पणे आणली.
निर्गम 35:29
ज्या इस्राएल लोकांना मदत करण्याची मनापासून इच्छा झाली त्या सर्वानी आपल्या खुषीने परमेश्वरासाठी अर्पणे आणली; परमेश्वराने मोशेला व लोकांना आज्ञा केल्याप्रमाणे वस्तू बनविण्यास त्यांचा उपयोग झाला.
निर्गम 36:8
मग त्या कसबी कारागिरांनी पवित्र निवास मंडप बांधण्याचे काम सुरु केले; त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळया, जांभळया व किरमिजी रंगाच्या सुताचे दहा पडदे तयार केले व त्यांच्यावर त्यांनी, पसरलेल्या पंखाच्या, करुब दूतांची चित्रे शिवली.
नीतिसूत्रे 31:19
ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते.