Home Bibles निर्गम 33:19 · मराठी बायबल
निर्गम 33:19 · मराठी बायबल

मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन.

Cross references

निर्गम 3:13

मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकाकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?”

निर्गम 34:5

मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तो मोशेपाशी उभा राहिला; तेव्हा मोशेने परमेश्वराचे नाव घेतले.

नहेम्या 9:25

त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला. सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला, उत्तम वस्तूनी भरलेली घरे त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी त्यांना आयत्या मिळाल्या. द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली, खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले. तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा त्यांनी उपभोग घेतला.

स्तोत्रसंहिता 25:13

तो माणूस चांगल्या गोष्टींचे सुख उपभोगील आणि त्याची मुले देवाने त्याला जी जमीन द्यायचे वचन दिले होते त्या जमिनीचे मालक बनतील.

स्तोत्रसंहिता 65:4

देवा, तू तुझ्या लोकांची निवड केलीस. आम्ही तुझ्या मंदिरात येऊन तुझी प्रार्थना करावी यासाठी तू आमची निवड केलीस आणि आम्ही खूप आनंदी आहोत. तुझ्या मंदिरातल्या आणि तुझ्या पवित्र राजवाड्यातल्या सगळ्या सुंदर विस्मयकारक गोष्टी आमच्या जवळ आहेत.

यशया 7:14

तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.

यशया 9:6

असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”

यिर्मया 31:12

इस्राएलचे लोक सियोनच्या शिखरावर येतील आणि आनंदाने आरोळ्या ठोकतील. परमेश्वराने दिलेल्या चांगल्या गोष्टींमुळे त्यांचे चेहरे आनंदाने उजळतील. परमेश्वर त्यांना धान्य, ताजा द्राक्षरस, ताजे तेल, कोकरे आणि गाई देईल. भरपूर पाणी मिळालेल्या बागेप्रमाणे त्यांची स्थिती होईल. इस्राएलच्या लोकांना पुन्हा कधीही त्रास होणार नाही.

यिर्मया 31:14

मी याजकांना भरपूर अन्न देईन. मी दिलेल्या चांगल्याचुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

जखऱ्या 9:17

सर्व काही चांगले आणि सुंदर होईल. सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल. पण हे पीक फक्त अन्नधान्य व मद्य देणारे नसेल तर तरुण - तरुणींचे असेल.

रोमकरांस 2:4

देव तुमच्याशी अत्यंत दयाळूपणे वागतो. तो तुमच्याशी सहनशीलतेने वागतो, तुमच्यामध्ये बदल व्हावा म्हणून देव वाट पाहतो, पण त्याच्या दयाळूपणाबद्दल तुम्ही काहीच विचार करीत नाही. कदाचित तुम्ही तुमचे मन व जीवन बदलावे म्हणून देव तुमच्याशी दयाळूपणे वागतो हे तुम्हांला समजत नसेल.

रोमकरांस 9:15

कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.

रोमकरांस 9:23

जी त्याच्या दयेची पात्रे होणार होती, त्यांना त्याने गौरव मिळण्यासाठी तयार केले, त्यांचे त्याने सहन केले यासाठी की त्यांना त्याच्या दयेची विपुलता कळावी.

इफिसकरांस 1:6

त्याने हे त्याच्या गौरवी कृपेची स्तुति व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हांला फुकट दिली.

Interlinear

Choose Theme