अहरोनाने लोकांकडून ते सोने घेतले; आणि ते ओतून व कोरणीने कोरुन त्यापासून वासराची मूर्ती केली.मग लोक म्हणाले, “हे इस्राएल, पाहा; हा तुमचा देव! यानेच तुला मिसर देशातून बाहेर आणले.”
Cross references
“मी याव्हे तुझा प्रभू, तुझा देव आहे. तुम्ही मिसरमध्ये गुलाम होता तेव्हा मीच तुम्हाला तेथून गुलामगिरीतून सोडवून आणले.
“तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करु नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करु नकोस;
माझ्या स्पर्धेत तुम्ही सोन्या चांदीच्या मूर्ती करु नये असे खोटे देव तुम्ही करता कामा नये.”
“मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत.
कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत.
इस्राएल लोकांनी असे पाहिले की बराच वेळ होऊन गेला तरी मोशे पर्वतावरून खाली आला नाही; तेव्हा सर्व लोक अहरोनाभोवती जमले व त्याला म्हणाले, “पाहा, मोशेने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले परंतु मोशेचे काय झाले ते आम्हांस कळत नाही, म्हणून आमच्यापुढे चालतील असे देव आमच्यासाठी तयार कर; आम्ही त्यांच्या मागे जाऊ.”
मी त्यांना करावयास संगितलेल्या गोष्टीपासून किती लवकर ते दूर गेले आहेत! त्यांनी आपल्यासाठी सोने वितळवून वासराची मूर्ती केली आहे; ते त्याची पूजा करीत आहेत व त्याला अर्पणे वाहात आहेत; ते म्हणत आहेत, ‘हे इस्राएल, ह्याच देवांनी तुला मिसर देशातून बाहेर आणले आहे.”
“मी पाहिले की तुमचा देव परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागून तुम्ही पाप केले होते. तुम्ही वासराची सोन्याची ओतीव मूर्ती केली होती. तुम्ही परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळण्याचे थांबविलेत!
इस्राएल लोकांनी ज्या अनेकांचा पराभव केला त्यात इश्माएलीही होते. हे इश्माएली पुरुष सोन्याची कुंडले घालत. गिदोन इश्माएलींना म्हणाला, “तुम्ही जी लूट मिळवली आहे त्यातून तुमच्यापैकी प्रत्येकाने मला अशी सोन्याची कुंडले करुन द्या.”
या सोन्यातून गिदोनने एफोद बनवला तो त्याने आपल्या अफ्रा या गावी ठेवला. सर्व इस्राएल लोक त्याची पूजा करु लागले. परमेश्वरावरची त्यांची निष्ठा ढळून ते एफोदच्या नादी लागले. गिदोन आणि त्याचे कुटुंब यांना हा एफोद सापव्व्याप्रमाणे ठरुन त्यांना पापाचरणासाठी प्रवृत्त करायला कारणीभूत झाला.
मीखाने ते सर्व रुपे आपल्या आईला परत केले ती म्हणाली, “हे मी आता परमेश्वरालाच अर्पण करते. मी ते तुझ्या हवाली करते. तू देवाची एक मूर्ती करुन ती या चांदीने मढव तेव्हा आता हे रुपे तूच घे.”
त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
याखेरीज त्याने एक नवा सणही सुरु केला. यहूदामधील वल्हांडणाच्या सणासारखाच हा होता. पण पहिल्या महिन्याच्या पंधराव्या दिवसाऐवजी हा आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी त्याने ठेवला. या दिवशी हा राजा बेथेल नगरातील वेदीवर यज्ञ करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. तसेच त्याने केलेल्या वासरांना बळी अर्पण करत असे. त्याने उंच ठिकाणी बांधलेल्या देवाळांसाठी बेथेल मधले पुरोहितही नेमले.
पण नबाटचा मुलगा यराबाम याने जी पापे इस्राएलला करायला लावली त्यापासून येहू पूर्णपणे परावृत्त झाला नाही. बेथेल आणि दान इथली सोन्याची वासरे त्याने उध्वस्त केली नाहीत.
यराबामने बोकड आणि वासरे यांच्या मूर्ती उच्चस्थानी स्थापन केल्या आणि त्यांच्या पूजेसाठी आपले याजक निवडले.
“आता तुम्ही लोकांना परमेश्वराचे राज्य म्हणजे दावीदाच्या मुलांची सत्ता असलेल्या राज्याचा पराभव करण्याचा निश्चय केला आहे. तुम्ही संख्ये ने वरचढ आहात आणी यराबामने तुमच्यासाठी देव म्हणून बनवलेली सोन्याची वासरे तुमच्याकडे आहेत.
त्यांनी सोन्याच्या वासारांच्या मूर्ती केल्या आणि “आम्हाला मिसर मधून सोडवणारे हेच ते देव’ असे ते म्हणाले. तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
त्या लोकांनी होरेब पर्वतावर सोन्याचे वासरु केले. त्यांनी मूर्तीपूजा केली.
त्या लोकांनी त्याच्या वैभवशाली देवाची गवतखाणाऱ्या बैलाच्या मूर्तीबरोबर अदलाबदल केली.
देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.
काही लोक मूर्ती करतात. (म्हणजेच खोटे देव करतात.) पण त्यांचा काही उपयोग नाही. लोक त्या मूर्तीवर प्रेम करतात पण त्यांना काही किंमत नाही. हे लोक त्या मूर्तीचे साक्षीदार आहेत पण ते काही पाहू शकत नाहीत. ते काही जाणत नाहीत. आपल्या कृत्यांबद्दल लज्जित व्हावे एवढेही ज्ञान त्यांना नाही.
काही लोकांजवळ भरपूर सोने-चांदी असते. सोने त्यांच्या वटव्यातून गळत असते. चांदी ते तराजूने तोलतात. हे लोक कारागिराला पैसे देऊन लाकडापासून खोटा देव तयार करून घेतात. नंतर ते त्या देवाची पूजा करतात. त्याच्यापुढे नतमस्तक होतात.
इस्राएल लोकांनी त्यांचा राजा निवडला, पण सल्ला विचारण्यासाठी ते माझ्याकडे आले नाहीत. इस्राएल लोकांनी नेते निवडले, पण मी ओळखत असणाऱ्या लोकांची निवड त्यांनी केली नही. इस्राएल लोकांनी त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचा उपयोग स्वत:साठी मर्ती तयार करण्याकंरिता केला. म्हणून त्यांचा नाश होईल.
शोमरोनमधील लोक बेथ:आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश:रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली.
ते इस्राएली अधिकच पाप करतात. ते स्वत:साठी मूर्ती तयार करतात. कारागिर चमत्कतिपूर्ण चांदीच्या मूर्ती घडवितात व ते लोक त्या मूर्तीशी बोलतात. ते त्या मूर्तीपुढे बळी देतात. सोन्याच्या वासरांचे ते चुंबन घेतात.
त्यांनी याच काळात वासरासारखी दिसणारी एक मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला अर्पणे सादर केली. आपल्या हातांनी घडविलेल्या या मूर्तीपुढे त्यांनी आनंदोत्सव साजरा केला!
आपण देवाची मुले आहोत. म्हणून इतर लोक ज्या प्रकारे समजतात त्या प्रकारचा देव आहे असे आपण मुळीच समजू नये. तो सोने, चांदी, किंवा दगडासारखा नाही.
कारण जरी त्यांना देव माहीत होता तरी त्यांनी देव म्हणून त्याचा आदर केला नाही, किंवा त्याचे आभार मानले नाहीत, उलट ते आपल्या विचारात निष्फळ झाले आणि मूर्ख अंत;करणे अंधकारमय झाली.