देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्याने स्वत:च त्यांच्यावर कोरुन आज्ञा लिहिलेल्या होत्या.
Cross references
या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन सपाट दगडी पाट्या (आज्ञापट) मोशेला दिल्या.
मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “पहिल्या तुटलेल्या दोन पाट्याप्रमाणे आणखी दोन दगडी पाट्या तयार कर म्हणजे पहिल्या दोन पाट्यांवर लिहिलेलीच अक्षरे मी त्या पाट्यांवर लिहीन.
तेव्हा मोशेने पहिल्या पाट्यांसारख्याच आणखी दोन दगडी पाट्या तयार केल्या; दुसऱ्या दिवशी सकाळीच तो सीनाय पर्वतावर गेला; परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करून त्याने त्या दोन दगडी पाट्या आपल्योबरोबर नेल्या;
त्याचे असे झाले. परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार दगडी पाट्यांवर खोदून शब्दबद्ध केला होता. त्या पाट्या आणायला मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
“मग मी मागे फिरुन डोंगर उतरुन आलो. डोंगरावर आग धगधगत होती. माझ्या हातात आज्ञापटाच्या दोन पाट्या होत्या.
“तेव्हा हुबेहूब पहिल्यासारख्या दोन सपाट दगडी पाट्या परमेश्वराने मला घडवायला सांगितल्या. ‘त्या घेऊन माझ्याकडे डोंगरावर ये आणि एक लाकडी पेटीही कर’ असे ही सांगितले.
मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे असे मला वाटते.
तुम्ही दाखवून देता की, तुम्ही ख्रिस्ताकडून आलेले पत्र आहात, आणि ते आमच्या सेवेचा परिणाम शाईने लिहिलेले पत्र नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने लिहिलेले, दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी हृदयाच्या पाट्यांवर लिहिलेले आहात.
आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते.
परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसांनंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा कराक करीन; मी माझे नियम त्यांच्या अंत:करणात घालीन, त्यांच्या ह्रदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होइन, ते माझे लोक होतील.