Home Bibles निर्गम 30:10 · मराठी बायबल
निर्गम 30:10 · मराठी बायबल

“अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगावर प्रायश्चित्त करावे; लोकांच्या पापांची भरपाई करण्यासाठी अहरोनाने पापार्पणातील रक्त घेऊन ते वेदीवर अर्पण करावे. ह्या दिवसाला ‘प्रायश्चित दिवस’ म्हणावे. हे परमेश्वरासाठी परम पवित्र आहे.”

Cross references

निर्गम 29:36

त्या सात दिवसात दर दिवशी एक गोज्या मारून अर्पण करावा. अहरोन व त्याच्या मुलांनी केलेल्या पापांच्या प्रायश्चितासाठी-भरपाईसाठी हा होम होय, वेदी शुद्ध करण्यासाठी तिच्यावर जैतुनाचे तेल ओतावे

लेवीय 4:7

मग त्याने त्यातले काही रक्त घेऊन दर्शनमंडपापुढे परमेश्वरासमोर असलेल्या धूपवेदीच्या शिंगांना ते लावावे; मग त्या गोऱ्हाचे राहिलेले सगळे रक्त दर्शनमंडपाच्या दारापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे;

लेवीय 4:18

मग त्याने दर्शनमंडपातील परमेश्वरासमोर असलेल्या वेदीच्या शिंगांना थोडे रक्त लावावे, व बाकीचे सर्व रक्त दर्शनमंडपापाशी असलेल्या होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.

लेवीय 16:5

“अहरोनाने इस्राएलाच्या मंडळीकडून पापार्पणाकरिता दोन बकरे व होमार्पणाकरित एक मेंढा घ्यावा.

लेवीय 16:18

मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

लेवीय 16:29

“तुमच्यासाठी हा एक कायमचा विधीनियम असावा; सातव्या महिन्याच्या दशमीस तुम्ही अन्न न घेता,जिवास दंडन करावे, तुम्ही नम्र व्हावे; त्या दिवशी तुम्ही तसेच तुमच्या देशात राहणारे परके किंवा परदेशी ह्यापैकी कोणीही कसलेच काम करु नये;

लेवीय 23:27

“सातव्या महिन्याचा दहावा दिवस हा प्रायश्चिताचा दिवस म्हणून पाळावा; त्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; काही न खाता आपल्या जिवांस दंडन करुन नम्र व्हावे व परमेश्वराला अर्पण अर्पावे.

इब्री लोकांस 1:3

पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूल बसला.

इब्री लोकांस 9:7

पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकवेदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वत:साठी (स्वत:च्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.

इब्री लोकांस 9:22

खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ प्रत्येक गोष्ट रक्ताने धुतलीच पाहिजे आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही.

इब्री लोकांस 9:25

जे त्याचे स्वत:चे नाही असे रक्त घेऊन जसा मुख्य याजक परमपवित्रस्थानात दरवर्षी जातो तसा ख्रिस्त पुन्हा पुन्हा परमपवित्रस्थानात गेला नाही.

Interlinear

Choose Theme