“शुद्ध सोन्याची एक पट्टी बनवावी आणि मुद्रा कोरतात त्याप्रमाणे तिच्यावर ‘परमेश्वरासाठी पवित्र’ ही अक्षरे कोरावीत.
Cross references
तुम्ही एक पवित्र राष्ट्र-याजक लोकांचे राज्य व्हाल’ या सर्व गोष्टी, मोशे, तू इस्राएल लोकांस सांग.”
“मग दोन गोमेद रत्ने घेऊन त्यांच्यावर इस्राएलाच्या मुलांची बारा नांवे कोरावीत.
कोरीव काम करणारा कारागीर ज्याप्रामाणे कुशलतेने एखादी मुद्रा कोरतो त्याप्रमाणे दोन्ही रत्नावर इस्राएलाच्या मुलांची नांवे कोरावी आणि ती सोन्याच्या कोंदणात बसवावीत.
कारागिरांनी अहरोन व त्याच्या मुलांसाठी तलम सणाच्या विणलेल्या कापडाचे कुडते केले.
मग त्यांनी पवित्र मुकुटासाठी शुद्ध सोन्याची पट्टी केली व तिच्यावर “परमेश्वर पवित्र” अशी अक्षरे कोरली.
नंतर त्याच्या डोक्यावर फेटा ठेवला; आणि फेट्याच्या पुढल्या भागावर सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट ठेवला; परमेश्वराने जसे करण्यास सांगितले होते, तसेच मोशेने केले.
मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे; मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांना समजलेच पाहिजे.”‘ तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.
“सर्व इस्राएल लोकांना सांग की मी तुमचा देव परमेश्वर आहे! मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र असलेच पाहिजे.
अहरोन आणि मोशे हे अम्रामचे मुलगे: अहरोन आणि त्याच्या वंशजाची खास कामाकरता निवड केली गेली होती. परमेश्वराच्या उपासनेच्या पवित्र कामाच्या तयारीसाठी त्यांना कायमचे वेगळे काढले गेले होते. परमेश्वरापुढे धूप जाळणे, परमेश्वराचे याजक म्हणून सेवा करणे, परमेश्वराच्या वतीने लोकांना आशीर्वाद देणे अशी त्यांची कामे होती.
परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील.तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
मदिराचा नियम पुढीलप्रमाणे आहे पर्वतमाथ्यावरची सर्व जागा अती पवित्र आहे. हा मंदिराचा नियम आहे.
त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील.
म्हणून येशू अगदी आपल्या गरजांस अनुरूप असा मुख्य याजक आहे, ज्याची आम्हाला गरज आहे. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाण्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा व पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. कारण त्याशिवाय (पवित्रतेेशिवाय) कोणालाही प्रभूला पाहता येणार नाही.
त्याऐवजी ज्या देवाने तुम्हाला पाचारण केले तो पवित्र आहे, तुम्हीसुद्धा प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल त्यात पवित्र असा.
पण तुम्ही निवडलेले लोक आहात. तुम्ही राज्याचे याजक आहात, तुम्ही पवित्र राष्ट्र आहात, तुम्ही देवाचे असलेले लोक आहात, यासाठी की, ज्या देवाने तुम्हाला अंधारातून काढून त्याच्या अदभुत प्रकाशात आणले त्याची सामर्थ्यशाली कृत्ये तुम्ही प्रकट करावी.
जे अशुद्ध आहे, ते त्या नगरात प्रवेश करु शकणार नाही.अथवा लाजिरवाणे काम अगर लबाडी करणाऱ्याचा शिरकाव त्या नगरात होणार नाही. कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ज्यालोकांची नावे नोंदविली आहेत, केवळ तेच लोक त्या नगरात जाऊ शकतील.