निर्गम 23:30 · मराठी बायबल
तेव्हा मी त्या लोकांना तुमच्या देशातून हळूहळू घालवून देईन; तेव्हा तुम्ही देश व्यापण्यास पुढे चालावे, आणि तुम्ही जसे पुढे जाल तसे मी तेथील इतर लोकांना तुमच्यापुढून घालवून देईन.
Cross references
यहोशवा 13:6
“लबानोनापासून मिस्रपोथ-माईमपर्यंत पसरलेल्या डोंगराळ भागात सीदोनी राहतात. पण इस्राएल लोकांसाठी मी या सर्वांना तेथून हुसकावून लावीन. इस्राएल लोकांमध्ये तू जमिनीची वाटणी करशील तेव्हा या भागाचेही लक्षात असू दे मी सांगितल्याप्रमाणे वाटे कर.
यहोशवा 23:5
तेथील रहिवाश्यांना तुमचा परमेश्वर देव घालवून देईल. तुम्ही ती आपल्या ताब्यात घ्याल. तेथील. लोकांना परमेश्वर हुसकावून लावील. तुमच्यासाठी त्याने हे करायचे कबूल केले आहे.
यहोशवा 23:9
“परमेश्वराने तुम्हाला तुमच्यापेक्षा बलाढ्य राष्ट्रांचा पराभव करायला मदत केली आहे. त्याने त्या लोकांना बाहेर पडायला भाग पाडले. कोणीही तुम्हाला आतापर्यंत पराभूत करु शकले नाही.