Home Bibles निर्गम 21:32 · मराठी बायबल
निर्गम 21:32 · मराठी बायबल

एखाद्या बैलाने जर गुलामाला हुंदडून ठार मारले तर त्या बैलाच्या मालकाने त्या गुलामाच्या मालकाला चांदीची तीस नाणीद्यावी आणि त्या बैलालाही दगडाने जिवे मारावे; गुलाम किंवा गुलाम स्त्री म्हणजे गुलाम पुरुष किंवा स्त्री यांना हा नियम सारखाच लागू राहील.

Cross references

उत्पत्ति 37:28

ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.

निर्गम 21:28

“एखाद्याच्या बैलाने एखाद्या पुरुषाला किंवा बाईला हुंदडून जिवे मारले तर त्या बैलास दगडमार करून जिवे मारावे, त्या बैलाचे मांस कोणी खाऊ नये, परंतु त्या बैलाचा मालक दोषी ठरणार नाही.

जखऱ्या 11:12

मग मी म्हणालो, “तुमची इच्छा असल्यास माझा पगार द्या. इच्छा नसल्यास देऊ नका.” तेव्हा त्यांनी मला तीस चांदीची नाणी दिली.

मत्तय 26:15

यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही महा काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्याला चांदीची तीस नाणी दिली.

मत्तय 27:3

त्याच वेळेला, यहूदा, जो येशूचा विश्वासघात करून त्याला पकडून देण्यास कारणीभूत होता, त्याने पाहिले कि, त्यांनी येशूला जिवे मारण्याचे ठरविले आहे, तेव्हा त्याने जे केले होते त्याचे त्याला वाईट वाटले. म्हणून त्याने चांदीची तीस नाणी घेऊन मुख्य याजक व वडिलांना परत दिली.

फिलिप्पैकरांस 2:7

उलट त्याने सर्व काही सोडून दोल, आणि त्याने गुलामाचे स्वरुप धारण केले आणि मनुष्याचे रुप धारण केले व तो आपल्या दिसण्यात मनुष्यासारखा झाला.

Interlinear

Choose Theme