Home Bibles निर्गम 19:21 · मराठी बायबल
निर्गम 19:21 · मराठी बायबल

परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू खाली जा आणि लोकांना बजावून सांग की त्यांनी माझ्याजवळ येऊ नये व माझ्याकडे बघू नये. जर ते तसे करतील तर बरेच जण मरतील.

Cross references

निर्गम 3:3

तेव्हा मोशे स्वत:शी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहातो.”

निर्गम 3:5

तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊनकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस.

निर्गम 19:12

परंतु लोकांना पर्वतापासून दूर राहाण्यास तू सांग; तेथे तू एक सीमारेषा काढ आणि लोकांनी ती ओलांडू नये असे तू त्यांना बजावून सांग; जर कोणा माणसाचा किंवा जनावराचा पर्वताला स्पर्श झाला तर त्याला दगडाने किंवा बाणाने मारून टाकावे. परंतु त्याला कोणीही स्पर्श करु नये. शिंगाचा आवाज ऐकू येईपर्यंत लोकांनी थांबावे. तो आवाज ऐकल्यावर ते पर्वत चढून जाऊ शकतील.”

निर्गम 33:20

परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही.

गणना 4:15

“अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थानातील सर्व पवित्र वस्तूवर आच्छादन टाकण्याचे पूर्ण करावे; मग कहाथी लोकांनी आत जावे आणि त्या वस्तू वाहून नेण्याचे काम सुरु करावे; अशा प्रकारे ते पवित्र वस्तूंना स्पर्श करणार नाहीत आणि मरणार नाहीत.

गणना 4:18

“सावध राहा! कहाथी लोकांचा नाश होऊदेऊ नका;

गणना 4:19

तुम्ही ही कामे करावीत म्हणजे मग कहाथी लोक परम पवित्र स्थानाजवळ जातील तेव्हा ते मरणार नाहीत; अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी परमपवित्रस्थानात जाऊन कहाथी लोकांतील एकेका माणसाला त्याने कोणकोणत्यावस्तू वाहून न्याव्यात ते सांगावे व ते दाखवावे.

गणना 4:20

जर तुम्ही असे करणार नाही तर मग कहाथी लोक कदाचित आत जातील व पवित्र वस्तू त्यांच्या नजरेस पडतील आणि त्यांनी तसे क्षणभर जरी पाहिले तरी ते मरतील.”

1 शमुवेल 6:19

पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला.

उपदेशक 5:1

देवाची उपासना करायला जाताना काळजी घ्या. मूर्ख लोकांप्रमाणे यज्ञ करण्यापेक्षा देवाचे ऐकणे चांगले आहे. मूर्ख लोक बरेचदा वाईट गोष्टी करतातत आणि ते त्यांना कळत देखील नाही.

इब्री लोकांस 12:28

म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची उपासना करू.

Interlinear

Choose Theme