Home Bibles निर्गम 18:3 · मराठी बायबल
निर्गम 18:3 · मराठी बायबल

इथ्रोने मोशेच्या दोन मुलांनाही बरोबर आणले. पहिल्या मुलाचे नांव गेर्षोम होते कारण त्याचा जन्म झाला त्यावेळी मोशे म्हणाला होता, “मी या देशात परका आहे.”

Cross references

निर्गम 2:22

सिप्पोराला एक मुलगा झाला. मोशेने त्याचे नांव गेर्षोम ठेवले.

निर्गम 4:20

तेव्हा मोशेने आपली बायको व आपल्या मुलांना गाढवांवर बसवले व त्यांना घेऊन तो मिसरला माघारी गेला. त्यांने देवाच्या सामर्थ्याने भरलेली आपली काठी बरोबर नेली.

1 इतिहास 23:15

गेर्षोम आणि अलियेजर हे मोशचे मुलगे.

स्तोत्रसंहिता 39:12

परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 7:29

‘जेव्हा मोशेने त्याला हे बोलताना ऐकले, तेव्हा तो इजिप्त सोडून पळून गेला. आणि मिद्यान्यांच्या देशात उपरी म्हणून राहू लागला आणि तेथेच त्याला दोन मुलगे झाले,

इब्री लोकांस 11:13

हे सर्व लोक विश्वासात मरण पावले. देण्यात आलेल्या वचनांचे प्रतिफळ त्यांना प्राप्त झाले नव्हते. परंतु त्यांनी विश्वासाने ते दुरूनच पाहिले व त्याचे स्वागत केले आणि त्यांनी उघडपणे कबूल केले की ते परके आणि प्रवासी आहेत.

1 पेत्र 2:11

प्रियजनहो, मी तुम्हाला तुम्ही जणू काय प्रवासी आणि या जगात परके असल्यासारखा बोध करतो की, तुमच्या आत्म्याच्या विरुद्ध नेहमी लढत राहणाऱ्या शारीरिक वासनांपासून तुम्ही दूर राहा.

Interlinear

Choose Theme