दुसऱ्या दिवशी मोशेला लोकांचा न्यायनिवाडा करण्याचे विशेष काम होते. लोक खूप असल्यामुळे त्यांना दिवसभर मोशेसमोर उभे रहावे लागले.
Cross references
पांढऱ्या गाढवांवर बसणाऱ्यांनो, खोगिराच्या बिछायतीवर बसणाऱ्यांनो आणि वाटेने चालणाऱ्यांनो इकडे लक्ष द्या.
“त्या दिवसांत मी नगराच्या वेशीपर्यंत जात असे आणि नगरातल्या वृध्दांबरोबर सार्वजनिक ठिकाणी बसत असे.
नंतर नवा राजा गादीवर बसेल. तो दाविदाच्या वंशातला असेल. तो सत्यप्रिय, प्रेमळ व दयाळू असेल. तो खरेपणाने न्याय देईल. तो योग्य व बरोबर अशाच गोष्टी करील.
राष्ट्रांनो, उठा! यहोशाफाटच्या दरीत गोळा व्हा. तेथे मी सभोवतालच्या राष्ट्रांचा न्याय करायला बसेन.
“नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांना मोशेच्या नियमशास्त्राचे स्पष्टीकरण करण्याचे अधिकार आहेत.
कोणाला बोध करण्याचे दान असेल तर त्याने बोध करण्यास वाहून घ्यावे. ज्याला दानधर्म देण्याचे दान असेल त्याने ते सद्हेतूने द्यावे. ज्याला अधिकाराचे दान असेल त्याने दक्षतेने ते काम करावे ज्याला देयेचे दान असेल त्याने आनंदाने दया करावी.
आणि त्यामुळेच तुम्ही कर देता. कारण ते देवाचे अधिकारी आहेत. व हेच काम ते करतात.