Home Bibles निर्गम 17:4 · मराठी बायबल
निर्गम 17:4 · मराठी बायबल

तेव्हा मोशे परमेश्वराकडे धावा करून म्हणाला, “मी ह्या लोकांना काय करु? ते मला ठार मारावयास उठले आहेत.”

Cross references

निर्गम 14:15

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुला माझा धावा करण्याची काही गरज नाही! इस्राएल लोकांना पुढे चालण्याची आज्ञा कर.

निर्गम 15:25

मोशेने परमेश्वराचा धावा केला तेव्हा परमेश्वराने त्याला एक झाड दाखवले. मोशेने ते झाड पाण्यात टाकले तेव्हा ते पाणी गोड म्हणजे पिण्यालायक झाले.त्यावेळी परमेश्वराने इस्राएल लोकांना विधी व नियम लावून दिला; तसेच त्याने त्यांचा विश्वासाची कसोटी घेतली.

गणना 11:11

मोशेने परमेश्वराला विचारले, “परमेश्वरा, तू माझ्यावर हे संकट का आणिले? मी तुझा दास आहे. माझे काय चुकले? तुला एवढे रागावण्यासारखे मी काय केले? ह्या सर्व लोकांची जबाबदारी तू माझ्यावर का टाकलीस?

गणना 14:10

सर्व लोक यहोशवाला आणि कालेबला दगडांनी ठार मारण्याची भाषा बोलू लागले. परंतु परमेश्वराची प्रभा दर्शन मंडपावर दिसू लागली. तेथून ती सर्व लोकांना दिसली.

गणना 16:19

कोरहनेसुद्ध तंबूच्या दारात लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराची प्रभा दिसली.

1 शमुवेल 30:6

आपल्या सर्व मुलाबाळांना कैदी म्हणून धरुन नेलेले पाहून सर्व सैन्याला दु:ख आणि संतापाने घेरले. दावीदला दगडांनी ठेचून मारावे असा विचार लोक बोलून दाखवू लागले. त्यामुळे दावीद फार व्याथित झाला. पण तो परमेश्वरावर भरवंसा ठेवून खंबीर राहिला.

स्तोत्रसंहिता 99:6

मोशे आणि अहरोन हे त्याचे याजक होते आणि शमुवेल त्याचे नाव घेणाऱ्यांपैकी एक होता. त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्याने त्यांना उत्तर दिले.

योहान 8:59

जेन्हा येशू असे बोलला तेव्हा लोकांनी त्याला मारण्यासाठी दगड उचलले. पण येशू गुप्त झाला आणि नंतर मंदिरात निघून गेला.

योहान 10:31

तेव्हा यहूदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडें उचलले.

प्रेषितांचीं कृत्यें 7:50

माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’ यशया 66:1-2

प्रेषितांचीं कृत्यें 14:19

नंतर अंत्युखिया व इकुन्या येथील काही यहूदी लोक तेथे आले. त्यांनी लोकसमुदायाची मने आपल्या बाजूस वळविली, आणि पौलाला दगडमार केला. त्यात पौल मेला असे समजून त्यांनी त्याला ओढत नेऊन नगराबाहेर टाकले.

Interlinear

Choose Theme