मिसरच्या लष्करात पुष्कळ घोडेस्वार व रथ होते. त्यांनी इस्राएल लोकांचा पाठलाग करुन इस्राएलींनी लाल समुद्र व बालसफोनाच्या दरम्यान पीहहीरोथ येथे तळ दिला होता तेथे त्यांना गाठले.
Cross references
म्हणून परमेश्वराने त्यांना दुसऱ्या मार्गाने तांबड्या समुद्राजवळील रानातून नेले. इस्राएल लोक मिसरमधून सशस्त्र होऊन निघाले होते.
“इस्राएल लोकांना असे सांग की, तुम्ही मागे फिरून मिग्दोल व (तांबडा) समुद्र यांच्यामध्ये व बालसफोना जवळ असलेल्या पी-हहीरोथ येथे तळ देऊन रात्री मुक्काम करावा.
शत्रु म्हणाला, ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन; माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वत: करिता घेईन.’
त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.
अशाप्रकारे तेथून सुटका झाल्यावर ते समुद्रापर्यंत आले तरी मिसरमधील लोक त्यांचा पाठलाग करत होते. रथ, घोडेस्वार यांच्यासह त्यांनी पाठलाग केला.