Home Bibles निर्गम 14:23 · मराठी बायबल
निर्गम 14:23 · मराठी बायबल

त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला.

Cross references

निर्गम 14:17

मी मिसरच्या लोकांची मने कठीण केली आहेत म्हणून ते तुमचा पाठलाग करतील. परंतु फारो व त्याचे सर्व सैन्य, घोडेस्वार व रथ यांच्यापेक्षा मी अधिक सामर्थ्यवान आहे, असे माझे महात्म्य मी तुम्हाला दाखवून देईन.

निर्गम 15:9

शत्रु म्हणाला, ‘मी त्यांचा पाठलाग करीन, त्यांना गाठीन, मी त्यांची सर्व संपत्ती लुटून घेईन; त्यामुळे माझा जीव तृप्त होईल. माझ्या तलवारीने त्यांचे सर्व काही हिरावून घेईन; माझ्या हातांनी त्यांचे सर्वकाही मी स्वत: करिता घेईन.’

निर्गम 15:19

फारोचे घोडे, घोडेस्वार व रथ समुद्रात गेले आणि परमेश्वराने त्यांना समुद्राच्या पाण्यात गडप केले; परंतु इस्राएल लोक भरसमुद्रातून कोरड्या जमिनीवरून चालत पार गेले.

1 राजे 22:20

देव म्हणाला, ‘अहाब राजाची कोणी फसगत करेल का? त्याने रामोथला अरामवर हल्ला करावा असे मला वाटते. त्यात त्याला मरण येईल.’ तेव्हा आता काय करावे याबद्दल देवदूतांमध्ये एकमत होईना.

उपदेशक 9:3

या आयुष्यात ज्या गोष्टी घडतात त्यातली सगव्व्यात वाईट गोष्ट म्हणजे सर्वांचा शेवट सारखाच होतो. लोक नेहमी दुष्ट आणि मूर्खपणाचा विचार करतात. ही गोष्ट सुध्दा वाईटच आहे हे विचार मरणाकडे नेतात.

यशया 14:24

सर्वशक्तिमान परमेश्वराने वचन दिले आहे. परमेश्वर म्हणाला, “मी वचन देतो, मी सांगितल्याप्रमाणे गोष्टी घडून येतील. मी योजल्याप्रमाणे सर्व होईल.

Interlinear

Choose Theme